Airtel Removed Data Benefits : देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेलनं आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. एअरटेलनं दोन प्लॅनमध्ये मिळणारे इंटरनेट डेटा फायदे कायमचे काढून टाकले आहेत. हे दोन प्लान ५०९ आणि १९९९ रुपयांचे आहेत.
भविष्यात तुम्हाला ५०९ किंवा १९९९ चा प्लान घ्ययचा असेल तर डेटा रिचार्जसाठी वेगळे पैसे खर्च करावे लागतील. सोप्या भाषेत सांगायचं तर आता Airtel चे ५०९ आणि १९९९ रुपयांचे प्लान महाग झाले आहेत. आताच्या आणि पूर्वीच्या प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांमध्ये किती फरक आहे ते तपशीलवार समजून घेऊ.
आता - एअरटेलचा ५०९ रुपयांचा प्लान ८४ दिवसांसाठी वैध असेल. या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा लाभ मिळेल. या प्लानमध्ये ग्राहकांना Apollo 24|7 चं सबस्क्रिप्शन आणि फ्री Hello tune मिळेल.
याआधी - एअरटेलच्या ५०९ रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉल आणि १०० एसएमएससह ६जीबी डेटा मिळत होता.
आता : एअरटेलच्या या प्लानमध्ये आता ग्राहकांना दररोज फक्त अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतील. या रिचार्ज प्लान ३६५ दिवस चालेल. कमीत कमी किंमतीत चांगला प्लान शोधत असलेल्या लोकांसाठी हा उत्तम प्लान असेल. एअरटेल वापरकर्त्यांना प्लानमध्ये अपोलो 24|7 सबस्क्रिप्शन आणि फ्री हॅलो ट्यून मिळेल.
यापूर्वी : एअरटेलच्या या प्लानमध्ये यापूर्वी एकूण २४ जीबी डेटा दिला जात होता. यासोबतच प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा देखील दिली जात होती.
संबंधित बातम्या