Gold Silver Price Today : लग्नांची तयारी करणाऱ्या कुटुंबासाठी आज आनंदाची बातमी आहे. सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्यामागे १०८९ रुपयांनी घसरून सरासरी ७६,६९८ रुपयांवर आला आहे. तर, चांदीच्या दरातही १७६२ रुपयांची घसरण झाली आहे.
आज चांदी ८९०८८ रुपयांवर उघडली. हा दर आयबीएचा आहे. यात जीएसटी आकारला जात नाही. त्यामुळं तुमच्या शहरातील दरात १००० ते २००० रुपयांचा फरक असेल.
मुंबईत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७९,६५७ रुपये आणि मागील आठवड्यात सोन्याचा भाव ७६,३४७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर, मुंबईत आज चांदीचा भाव ९४३०० रुपये प्रति किलो आणि गेल्या आठवड्यात ९१८०० रुपये प्रति किलो होता.
दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव २० रुपयांनी घसरून ३९,१०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७६,४९३ रुपये होता. आज चांदीचा भाव ९५,००० रुपये प्रति किलो होता तर गेल्या आठवड्यात ९२,५०० रुपये प्रति किलो होता.
चेन्नईत आज सोन्याचा भाव ७९,६५१ रुपये प्रति १० ग्रॅम होता तर गेल्या आठवड्यात तो ७६,३४१ रुपये प्रति १० ग्रॅम होता. चेन्नईत आज चांदीचा भाव १,०३,६०० रुपये प्रति किलो होता तर गेल्या आठवड्यात तो १,०१,६०० रुपये प्रति किलो होता.
कोलकात्यात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७९,६५५ रुपये असून गेल्या आठवड्यात तो ७६,३४५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. कोलकात्यात आज चांदीचा भाव ७५८०० रुपये प्रति किलो होता तर गेल्या आठवड्यात तो ९३३०० रुपये प्रति किलो होता.