Mutual fund : सेबीने असेस्ट मॅनेजमेंट कंपन्यांना १५ जूनपर्यंत देवाण घेवाण सुविधाजनक करण्याचे आदेश दिले आहे. तुमच्या १८ वर्षांखालील पाल्यासाठी म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसंदर्भातही नवे नियम जारी केले आहेत.
बाजार नियामक सेबीने गुंतवणूकदारांना त्यांच्या पाल्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठीचे नियम बदलले आहेत. सेबीने सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांना सांगितले आहे की, मुलांसाठी पालकांनी घेतलेल्या म्युच्युअल फंडासंदर्भातील प्रक्रिया येत्या १५ जून पासून सुलभ करण्यात याव्यात.
नव्या नियमांतर्गत अल्पवयीन मुलांच्या बँक खात्यात किंवा त्याच्या नावाने त्याच्या आईवडिलांच्या अथवा अपत्य- आईवडिल यांच्या संयुक्त खात्यात पैसे जमा करता येतील. आई वडिलांसाठी ही बाब अत्यंत दिलासादायक आहे. कारण या निर्णयानंतर पालकांना आपल्या अपत्याच्या म्युच्युअल फंड खात्यात थेट रक्कम जमा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी गुंतवणूकदारांना ई पर्कराची सुविधा उपलब्ध नव्हती.
सध्याच्या म्युच्युअल फंड फोलियोसंदर्भात सेबीने सांगितले की, अल्पवयीन मुलाच्या नावावर काढलेल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही केवळ त्याच्याच बँक खात्यात जमा होणार आहे. याचाच अर्थ, आपल्या मुलाच्या नावावर म्युच्युअल फंड काढताना त्यांच्या खात्यातून पैसे म्युच्युअल फंडातून जमा होतील. पण म्यॅच्युरिटीनंतरची रक्कम केवळ मुलाच्या खात्यात थेट जमा केली जाईल. नव्या नियमाची अंमलबजावणी १५ जूनपासून केली जाईल.