Gold Silver rate today : लगीनसराईच्या काळात सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर आज, म्हणजेच शुक्रवारी तोळ्यामागे ५५४ रुपयांनी वाढला आहे. तर, चांदीच्या दरानं ९४३ रुपयांची उसळी घेतली आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स (IBJA)नं प्रसिद्ध केलेल्या नवीन दरानुसार, आज २४ कॅरेट सोने ५५४ रुपयांनी महागले आणि ६३,१५३ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. सोन्याच्या दराच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा ही किंमत ६५२ रुपयांनी कमी आहे. मागील वर्षी ४ डिसेंबर २०२३ रोजी सोन्यानं तोळ्यामागे ६३८०५ रुपयांचा उच्चांकी दर नोंदवला होता.
चांदीच्या दरात प्रतिकिलो ९४३ रुपयांची बंपर वाढ झाली आहे. सराफा बाजारात चांदीची किंमत ७१,७७७ रुपये प्रति किलो आहे.
आज २३ कॅरेट सोन्याचा सरासरी भाव ५५२ रुपयांनी वाढून ६२९०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोने आता ५०७ रुपयांनी महागले असून तोळ्यामागे ५७८४८ रुपयांवर पोहोचलं आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅममागे ४१६ रुपयांनी वाढला असून तो आता ४७३६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, १४ कॅरेट सोन्याचा भाव ३२५ रुपयांनी वाढून ३६९४५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
सोने आणि चांदीचे हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने जारी केले आहेत. आयबीजेएच्या दरांनुसार, मुंबई, दिल्ली, गोरखपूर, लखनौ, जयपूर, इंदूर आणि पाटणासह सर्व शहरांमध्ये सोन्या-चांदीची सरासरी किंमत वाढली आहे. या दरावर जीएसटी आणि दागिने बनवण्याचं शुल्क लागू नाही. त्यामुळं तुमच्या शहरात सोने-चांदीची प्रत्यक्ष किंमत १ ते २ हजार रुपयांनी जास्त असण्याची शक्यता आहे.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव आज तोळ्यामागे ६३,६०० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ५८,३०० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव तोळ्याला ४७,७०० रुपये इतका आहे. तर, चांदीचा भाव मुंबईत किलोमागे ७६,५०० रुपये इतका आहे.