PM Kisan Yojana Latest Update : देशात नव्या एनडीए सरकारची स्थापना झाल्यानंतर पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता देण्यात आला होता. आता १८ व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र, तत्पूर्वी पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित १२ कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता लाभार्थी स्वत: पीएम किसान पोर्टल किंवा अॅपवरून आपला बदललेला मोबाइल नंबर नोंदवू शकणार आहेत.
पीएम किसानचा ऑगस्ट-नोव्हेंबरचा हप्ता या महिन्यापासून ३० नोव्हेंबरपर्यंत केव्हाही येऊ शकतो. सरकारकडून अद्याप कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. या योजनेचा १७ वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ जून रोजी जारी केला होता. आतापर्यंत १० कोटी ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० ते २००० रुपयांची रक्कम थेट वर्ग करण्यात आली आहे. आता लोक १८ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर बदलला असेल तर पीएम किसान पोर्टलवरून ताबडतोब मोबाइल नंबर अपडेट करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुमचा कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलवरून घरबसल्या हे सहज करता येणार आहे. त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करत राहा आणि तुमचा नंबर अपडेट करा.
> https://pmkisan.gov.in/ या पीएम किसान पोर्टलला भेट द्या.
> इथं फार्मर कॉर्नरमध्ये ई-केवायसीनंतर अद्ययावत मोबाइल नंबर, नवीन शेतकरी नोंदणी, स्वनोंदणीकृत शेतकरी / सीएससी शेतकऱ्यांची स्थिती, स्व-नोंदणीकृत शेतकऱ्यांचे अद्ययावतीकरण, आपली स्थिती जाणून घ्या. त्यावर क्लिक करा किंवा टॅप करा.
> इथं रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
> संमती तपासा आणि गेट आधार ओटीपीवर क्लिक करा.
> तुमच्या मोबाईलवर आधारशी लिंक एक ओटीपी येईल. तो दिलेल्या बॉक्समध्ये टाका आणि व्हेरिफाय बटणावर क्लिक करा.
> यानंतर तुमचा संपूर्ण तपशील तुमच्यासमोर येईल. यात नोंदणी क्रमांक, आपले नाव, मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक, जन्मतारीख आणि लिंग यांचा समावेश असेल. खालच्या बाजूला बॉक्समध्ये नवीन मोबाइल नंबर टाका आणि गेट ओटीपीवर क्लिक करा.
> ओटीपी टाका आणि व्हेरिफिकेशन करा. तुमचा नवीन नंबर जोडला जाईल.