मराठी बातम्या  /  बिझनेस  /  २० हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच 'महारत्न' कंपनीचा शेअर उसळला, तुमच्याकडं आहे का?

२० हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच 'महारत्न' कंपनीचा शेअर उसळला, तुमच्याकडं आहे का?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 01, 2024 01:57 PM IST

BHEL Share Price Rise : महारत्न कंपन्यांपैकी एक महत्त्वाची कंपनी असलेल्या 'भेल'नं वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे.

BHEL Share Price
BHEL Share Price

BHEL Share Price : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वत्र उत्साह दिसत असला तरी शेअर बाजार स्थितप्रज्ञासारखा चाल करत आहे. मात्र, काही कंपन्यांच्या शेअरनी मजबूत कामगिरी केली आहे. देशातील महारत्न कंपनीपैकी एक असलेल्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अर्थात भेलच्या शेअरनं आज जबरदस्त उसळी घेतली आहे. 

भेलचा शेअर शुक्रवारी १९३.४५ रुपयांवर बंद झाला होता. आज सकाळच्या सत्रात कंपनीचा शेअर तब्बल ५ टक्क्यांनी वाढून २०४.६५ रुपयांवर पोहोचला. सध्या हा शेअर १९८.७५ रुपयांवर ट्रेड करत आहे. भेल कंपनीला तालाबिरा पॉवर प्रोजेक्टचं १९,४२२ कोटींचं कंत्राट मिळाल्याचं वृत्त आहे. यामुळं शेअरमध्ये ही वाढ पाहायला मिळाली आहे. आजच्या उसळीमुळं भेलनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. 

IPO : आयपीओ म्हणजे काय? जाणून घ्या स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीचा भन्नाट पर्याय

नव्या प्रकल्पांतर्गत भेल कंपनी NLC India साठी ओडिशातील तालाबिरा इथं औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी भेलनं L&T-MHI पेक्षा अधिक बोली लावली होती, असं बिझनेसलाइनच्या वृत्तात असे म्हटले आहे. शुक्रवारी या प्रकल्पासाठी आर्थिक निविदा उघडण्यात आल्या. भेल NLC इंडियासाठी प्रत्येकी ८०० मेगावॅटचे ३ अल्ट्रा सुपरक्रिटिकल युनिट्स बांधणार आहे.

१० महिन्यांत शेअरमध्ये २०० टक्क्यांची वाढ

भेलचा शेअर अवघ्या १० महिन्यांत २०३ टक्क्यांनी वाढला आहे. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी कंपनीचा शेअर ६७.०५ रुपयांवर होता. आज, १ जानेवारी २०२४ रोजी याच शेअरनं २०४.६५ रुपयांचा उच्चांक गाठला आहे. 

iPhone: आयफोन चाहत्यांसाठी गूड न्यूज; प्रो मॉडेलमध्ये मिळणार एवढा मोठा डिस्प्ले!

गेल्या एका वर्षात भेलच्या शेअर्समध्ये १५५ टक्के वाढ झाली आहे. तर, मागच्या ६ महिन्यांत १३० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. ३ जुलै २०२३ रोजी कंपनीचे शेअर ८८.२९ रुपयांवर होते. १ जानेवारी २०२४ रोजी भेलचे शेअर्स २०४.६५ रुपयांवर पोहोचले आहेत. भेलच्या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ६६.३० रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

 

 

WhatsApp channel

विभाग