दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये न्यूमरोस मोटर्सने आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक स्कूटर डिप्लोस मॅक्स लाँच केली आहे. ही ई-स्कूटर डिप्लोस प्लॅटफॉर्मअंतर्गत लाँच करण्यात आली आहे, ज्याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 86,999 रुपयांपासून सुरू होते. तर डिप्लोस मॅक्सची एक्स शोरूम किंमत 1,09,999 रुपये आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर पीएम ई-ड्राइव्ह योजनेसह सिंगल चार्जवर 140 किमी ड्रायव्हिंग रेंज देईल. या इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी 3-4 तासांपेक्षा कमी वेळात फुल चार्ज होऊ शकते. तर ही स्कूटर ताशी ६३ किलोमीटरचा टॉप स्पीड देते.
सुरक्षिततेसाठी डिप्लोस प्लॅटफॉर्ममध्ये ड्युअल डिस्क ब्रेक, एलईडी लाइटिंग, जिओफेन्सिंग आणि व्हेइकल ट्रॅकिंग सारखे प्रगत तंत्रज्ञान आहे. तर स्कूटरचे चेसिस, बॅटरी, मोटर आणि कंट्रोलर सतत दीर्घकाळ टिकणाऱ्या परफॉर्मन्ससाठी डिझाइन करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्याचे रुंद टायर दीर्घकाळ टिकणाऱ्या टिकाऊपणासाठी डिझाइन केलेले आहेत.
संबंधित बातम्या