Hyundai Ioniq 9: दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये ऑटोमोटिव्ह निर्माता ह्युंदाईने त्यांची इलेक्ट्रिक कार ह्युंदाई आयोनिक ९ सादर केली. ही कार जागतिक बाजारात लॉन्च झाली असली तरी पहिल्यांदाच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतातील क्रेटा इलेक्ट्रिकनंतर कोरियन निर्मात्याची चौथी इलेक्ट्रिक कार आहे.
ह्युंदाई आयनिक ९म ही भारतातील ह्युंदाईची सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार आहे. ह्युंदाई आयनिक ९ ह्युंदाईच्या नवीन जनरेशन ई-जीएमपी प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ही कार भारतीय बाजारात दाखल झाल्यानंतर किआ ईव्ही ९ आणि एमजी एम ९ सारख्या इलेक्ट्रिक कारला टक्कर देईल, असा कंपनीचा दावा आहे.
ह्युंदाईची ही कार स्टायलिश लूकसह बाजारात दाखल होईल. या कारच्या फ्रंटमध्ये पॅरामेट्रिक पिक्सल लॅम्प सेटअपसह लहान क्यूब प्रोजेक्शन हेडलाइट्स आणि इंटेलिजंट फ्रंट- लाइटिंग सिस्टम देण्यात आले आहे. कारच्या मागच्या बाजूस एलईडी लाइट्स लावण्यात आले आहेत.
या कारमध्ये ११०. ३ किलोवॅट बॅटरी पॅक देण्यात आला आहे, ज्यामुळे ही कार एकदा चार्ज केल्यानंतर ६२० किलोमीटर धावेल. ही कार ३५० किलोवॅट चार्जरचा वापर करून वेगाने चार्ज केले जाऊ शकते. कंपनीने असा दावा केला आहे. ही कार अवघ्या २४ मिनिटांत १० टक्के ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.
जागतिक बाजारात ह्युंदाई आयनिक ९ इलेक्ट्रिक कार आरडब्ल्यूडी, परफॉर्मन्स एडब्ल्यूडी आणि लॉन्ग रेंज एडब्ल्यूडी मअशा तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले. लाँग रेंज रिअर व्हील ड्राइव्ह व्हर्जनमध्ये रियर एक्सलवर १६० किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. लाँग रेंज एडब्ल्यूडी व्हेरियंटमध्ये मागील चाकांना पॉवर देण्यासाठी १६० किलोवॅटची मोटर आणि फ्रंट व्हील्सला पॉवर देण्यासाठी ७० किलोवॅटची मोटर देण्यात आली आहे.
मॉडेल केवळ ५.२ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेगाने धावू शकते. तर, लाँग रेंज एडब्ल्यूडी व्हेरिएंट ६.७ सेकंदात धावू शकते. लाँग रेंज आरडब्ल्यूडी व्हर्जन ९.४ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेगाने धावते. दरम्यान, भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये अनेक दमदार कार लॉन्च करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या