CNG Scooter: ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये टीव्हीएसचा धमाका; सादर केली जगातील पहिली सीएनजी स्कूटर!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  CNG Scooter: ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये टीव्हीएसचा धमाका; सादर केली जगातील पहिली सीएनजी स्कूटर!

CNG Scooter: ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये टीव्हीएसचा धमाका; सादर केली जगातील पहिली सीएनजी स्कूटर!

Jan 19, 2025 12:10 AM IST

Bharat Mobility Global Expo 2025: भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये दुचाकी निर्माता कंपनी टीव्हीएसने जगातील पहिली सीएनजी स्कूटर लॉन्च केली आहे.

ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये टीव्हीएसने जगातील पहिली स्कूटर केली सादर
ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये टीव्हीएसने जगातील पहिली स्कूटर केली सादर

Worlds First CNG Scooter:  टीव्हीएस मोटर कंपनीने ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये जगातील पहिली सीएनजी स्कूटर ज्युपिटर १२५ सीएनजी सादर केली आहे. गेल्या वर्षी बजाजने जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च केली होती. त्यानंतर टीव्हीएसने जगातील पहिली सीएनजी स्कूटर लॉन्च करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ही स्कूटर सीएनजी व्यतिरिक्त पेट्रोलवरही चालेल.

नवीन टीव्हीएस ज्युपिटर १२५ सीएनजीमध्ये १.४ किलो क्षमतेची ९ लीटर सीएनजी टँक आहे सीएनजी इंधन पर्यायासाठी टेल-टेल लाइट्सचा समावेश करण्यासाठी इंस्ट्रूमेंट कंसोल देखील अपडेट्स करण्यात आला आहे. टीव्हीएसने ज्युपिटर सीएनजीची पेट्रोल टाकीची क्षमता पाच लिटरवरून दोन लिटर पर्यंत कमी केली आहे. 

ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये टीव्हीएसचा धमाका; सादर केली जगातील पहिली सीएनजी स्कूटर!
ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये टीव्हीएसचा धमाका; सादर केली जगातील पहिली सीएनजी स्कूटर!

टीव्हीएस ज्युपिटर १२५ सीएनजी: इंधन कार्यक्षमता

टीव्हीएस ज्युपिटर सीएनजीवर २२६ किमी (सीएनजी + पेट्रोल) एकत्रित इंधन कार्यक्षमतेचा दावा करते. कंपनीचे म्हणणे आहे की, सीएनजी स्कूटर एक किलो सीएनजीमध्ये ८४ किमी अंतर पार करू शकते. ही स्कूटर पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर चालू शकते, स्विचच्या फ्लिकवर इंधन पर्यायांपैकी एक निवडण्याचा पर्याय आहे. या स्कूटरची रनिंग कॉस्ट १ रुपये प्रति किलोमीटर असेल, असेही कंपनीचे म्हणणे आहे.

टीव्हीएस ज्युपिटर १२५ सीएनजी: स्पेसिफिकेशन्स

सीएनजीवर चालण्यासाठी पुन्हा काम केलेल्या १२४.८ सीसी सिंगल सिलिंडर इंजिनमधून पॉवर येत आहे. सीएनजी व्हर्जन ६००० आरपीएमवर ७.१ बीएचपी पॉवर आणि ५५०० आरपीएमवर ९.४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. टॉप स्पीड ताशी ८० किमी पर्यंत मर्यादित आहे.

TVS has not announced yet on when it plans to launch the Jupiter 125 CNG in the market
TVS has not announced yet on when it plans to launch the Jupiter 125 CNG in the market

टीव्हीएस ज्युपिटर १२५ सीएनजीमध्ये एप्रोनवरील सीएनजी ब्रँडिंग वगळता कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात  सस्पेन्सन, ब्रेक, चाके आणि बरेच काही यासह अनेक गोष्टी पूर्वीप्रणाणेच आहे,  त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही.  टीव्हीएसने सीएनजी व्हर्जन कधी लाँच करण्याची योजना आखली आहे, हे जाहीर केलेले नाही, परंतु, ब्रँडला अनुकूल प्रतिसाद मिळाल्यास हे मॉडेल या वर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल होऊ शकते.

Whats_app_banner