दिवाळी संपतच नाही! एका वर्षात शेअरनं दिला ६,००० टक्के परतावा; आता कंपनी करणार ट्रिपल धमाका
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  दिवाळी संपतच नाही! एका वर्षात शेअरनं दिला ६,००० टक्के परतावा; आता कंपनी करणार ट्रिपल धमाका

दिवाळी संपतच नाही! एका वर्षात शेअरनं दिला ६,००० टक्के परतावा; आता कंपनी करणार ट्रिपल धमाका

HT Marathi Desk HT Marathi
Nov 16, 2024 06:44 PM IST

Bharat Global Developers share price : भारत ग्लोबल डेव्हलपर्स ही कंपनी शेअरहोल्डर्सना तिहेरी सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे.

इतक्या कमी वेळात इतका पैसा कुठे मिळतो? एका वर्षात शेअरनं दिला ६,००० टक्के परतावा
इतक्या कमी वेळात इतका पैसा कुठे मिळतो? एका वर्षात शेअरनं दिला ६,००० टक्के परतावा

Stock Market Marathi Updates : येत्या आठवड्यात भारत ग्लोबल डेव्हलपर्सचा शेअर आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ६००० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. इतका जबरदस्त परतावा दिल्यानंतर आता कंपनी बोनस, स्प्लिट आणि डिविडंडसह ट्रिपल धमाका करण्याच्या तयारीत आहे.

कंपनीनं १२ नोव्हेंबर रोजी शेअर बाजाराला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, प्रत्येक १० शेअरमागे गुंतवणूकदारांना ८ शेअर्स मोफत दिले जाणार आहेत. तर, १० रुपये अंकित मूल्य असलेला शेअर १० तुकड्यांमध्ये विभागला जाणार आहे. याशिवाय कंपनी एका शेअरवर १०० टक्के अंतरिम लाभांश देण्याच्या तयारीत आहे. या तिन्ही प्रस्तावांवर १८ नोव्हेंबर २०२४ रोजी निर्णय होणार आहे. या दिवशी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे.

शेअरची दमदार वाटचाल

कंपनीच्या संचालक मंडळानं या तीन प्रस्तावांवर निर्णय घेतल्यास प्रथमच बोनस शेअर, लाभांश आणि स्टॉक स्प्लिट होणार आहे. गुरुवारी कंपनीच्या शेअरला अपर सर्किट लागलं. त्यानंतर कंपनीचा शेअर ११५२.८० रुपयांच्या पातळीवर बंद झाला. भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये गेल्या तीन महिन्यांत ५५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, २०२४ मध्ये कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १९७१.८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर शेअरच्या किंमतीत वर्षभरात ६०७७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ११५२.८० रुपये आणि कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १९.५९ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ११,६७३.२१ कोटी रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

 

Whats_app_banner