३०० कोटींची ऑर्डर मिळताच 'हा' शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड, एका वर्षात दिलाय ४७०० टक्के परतावा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ३०० कोटींची ऑर्डर मिळताच 'हा' शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड, एका वर्षात दिलाय ४७०० टक्के परतावा

३०० कोटींची ऑर्डर मिळताच 'हा' शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड, एका वर्षात दिलाय ४७०० टक्के परतावा

HT Marathi Desk HT Marathi
Nov 04, 2024 03:44 PM IST

Bharat Global Developers Ltd share Price : भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडच्या शेअरमध्ये ५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीला ३०० कोटींची ऑर्डर मिळाल्याचा हा परिणाम आहे.

(भारत ग्लोबल डेव्हलपर्स लि.
(भारत ग्लोबल डेव्हलपर्स लि.

Smallcap Stocks : तब्बल ३०० कोटींचं कंत्राट मिळताच भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडच्या शेअरला अप्पर सर्किट लागलं आहे. या शेअरमध्ये तब्बल ५ टक्क्यांची वाढ होऊन तो बीएसईवर ७८०.४५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे.

भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडचा शेअर सोमवारी बीएसईवर ७७६.८५ रुपयांवर उघडला. काही काळानंतर कंपनीच्या शेअर्सचा भाव बीएसईमध्ये ७८०.४५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. भारत डेव्हलपर्स लिमिटेडचे शेअर्स ३१ ऑक्टोबर २०२४ पासून सातत्यानं वरच्या सर्किटमध्ये आहेत.

गेल्या वर्षभरात भारत डेव्हलपर्स लिमिटेडच्या शेअरच्या किमतीत ४९७४.४५ टक्के वाढ झाली आहे. तर २०२४ मध्ये शेअरच्या किंमतीत १३०३.६८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, केवळ ९० दिवसांत हा शेअर ३०८ टक्क्यांनी वधारला आहे. त्यामुळं या कालावधीत पोझिशनल गुंतवणूकदारांचे पैसे दुपटीहून अधिक वाढले आहेत.

३०० कोटींचं कंत्राट कुठून मिळालं?

भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडची उपकंपनी असलेल्या भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडच्या अ‍ॅग्रीटेक डिव्हिजनला मॅक्केन इंडिया अ‍ॅग्रो प्रायव्हेट लिमिटेडकडून पहिली मोठी ऑर्डर मिळाली आहे. पुढील सहा महिन्यांत कंपनीला २,००,००० टन कुफरी अशोल बटाट्याची डिलिव्हरी करायची आहे. या ऑर्डरचं मूल्य सुमारे ३०० कोटी रुपये आहे. या ऑर्डरमुळं कृषी क्षेत्रातील कंपनीचं स्थान आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. कृषी क्षेत्राच्या पुरवठा साखळीत भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेड अत्यंत महत्त्वाची आहे. भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडचे पूर्वीचे नाव क्राफ्टन डेव्हलपर्स लिमिटेड होते.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner