मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger stocks : शाॅर्ट टर्ममध्ये चांगला नफा कमावायचाय? विमा क्षेत्रातील हे स्टाॅक्स देतील तुमची भक्कम साथ !

Multibagger stocks : शाॅर्ट टर्ममध्ये चांगला नफा कमावायचाय? विमा क्षेत्रातील हे स्टाॅक्स देतील तुमची भक्कम साथ !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 17, 2023 05:27 PM IST

Multibagger stocks : २०२३ मध्ये आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स या विमा कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलेला नाही. नजीकच्या भविष्यात या दोन्ही समभागांमध्ये अनुक्रमे २८ टक्के आणि २१ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

insurance stocks HT
insurance stocks HT

Multibagger stocks : वर्ष २०२३ मध्ये विमा क्षेत्राची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. विमा क्षेत्राशी संबंधित बहुतेक शेअर्सनी निफ्टी इंडेक्स बेंचमार्कपेक्षा कमी परतावा दिला आहे. जवळपास सर्वच विमा कंपन्यांची कामगिरी निराशाजनक आहे. तथापि, ट्रेंडलाइन डेटानुसार नजिकच्या भविष्यात विमा क्षेत्रातील आठ कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

एलआयसी

आज एलआयसीचा आयपीओ दाखल होऊन एक वर्ष पूर्ण झाली आहेत. एलआयसी स्टॉक नजीकच्या काळात सुमारे ४१% वर चढू शकतो. सध्या एलआयसीचा शेअर ५६७.६५ रुपयांवर व्यवहार करत आहे. वार्षिक आधारावर LIC स्टॉकची कामगिरी १७% नी कमी झाली आहे. कंपनी गेल्या २ वर्षांपासून अत्यंत कमी कर्जासह तिच्या वार्षिक नफ्यात सुधारणा करत आहे.

एसबीआय लाईफ इन्शुरन्स

एसबीआय लाईफ इन्शुरन्सच्या शेअर्समध्ये नजीकच्या भविष्यात २८ टक्के वाढ होऊ शकते. एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी तिमाही आधारावर तिचा निव्वळ नफा वाढवत आहे. नफ्याचे प्रमाणही सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. वर्षाच्या आजपर्यंतच्या आधारावर स्टॉकची कामगिरी ३% नी घसरली आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सच्या स्टॉकमध्ये नजीकच्या काळात सुमारे २८% ची वाढ दिसू शकते. तथापि, आजपर्यंतच्या वार्षिक आधारावर शेअर्सच्या कामगिरीत ३% ची घट झाली आहे. तिमाही आणि तिमाही आधारावर कंपनीचा निव्वळ नफा आणि नफा मार्जिन वाढताना दिसत आहे. कंपनीचे कर्ज खूपच कमी आहे.

आयसीआयसीआय़ लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स येत्या काळात या शेअरमध्ये २१ टक्के तेजी येण्याची शक्यता आहे. सध्या खूपच कमी कर्ज असलेली ही कंपनी आहे. तिचा निव्वळ नफा दर तिमाही वाढत आहे.

स्टार हेल्थ अँड अलाइन्ड इन्शुरन्स

स्टार हेल्थच्या शेअर्समध्ये १६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. आजपर्यंतच्या वार्षिक कामगिरीच्या आधावर कंपनीच्या स्टाॅकमध्ये एक टक्का वाढ झाली आहे.गेल्या ४ तिमाहींपासून कंपनी प्रत्येक तिमाहीत आपला महसूल सातत्याने वाढवत आहे.

एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स

एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स शेअर्सच्या किमतीत अंदाजे १४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. वर्षानुवर्षे त्यांच्या निव्वळ नफ्यात वाढ दिसून येत आहे. कंपनीचे कर्ज कमी असून विदेशी गुंतवणूकदार सातत्याने कंपनीत भागभांडवल गुंतवत आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग