Stock Market News Update : शेअर बाजारात काल झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर आज गुंतवणूकदार सावध झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मार्केट एक्सपर्ट्सनी इंट्रा-डे ट्रेडिंगसाठी काही शेअर्सची शिफारस केली आहे. यात १०० रुपयांपेक्षा कमी किमतीचे शेअर्स आहेत.
एसएस वेल्थस्ट्रीटच्या बाजार तज्ज्ञ सुगंधा सचदेवा, लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे रिसर्च हेड अंशुल जैन आणि हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी (रिसर्च) महेश एम ओझा यांनी ७ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यात बँक ऑफ महाराष्ट्र, एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज, वक्रंगी, पैसालो डिजिटल, एनएएलसी, नीरज सिमेंट आणि पॅरामाऊंट कम्युनिकेशन्स यांचा समावेश आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र : बँक ऑफ महाराष्ट्र ५२.४० रुपयांना खरेदी करा, लक्ष्य ५५.५० रुपये ठेवा आणि स्टॉपलॉस ५०.५० रुपयांवर ठेवा.
एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज : एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीजचा शेअर ३९.८० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ४२.४० रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस ३८.३० रुपये लावा.
नीरज सिमेंट : नीरज सिमेंट ६६ रुपयांना खरेदी करा, टार्गेट १०० रुपये ठेवा, स्टॉपलॉस ५५ रुपये (क्लोजिंग बेसिस) ठेवा.
पॅरामाऊंट कम्युनिकेशन्स : पॅरामाऊंट कम्युनिकेशन्सचा शेअर ८५ रुपयांपर्यंत घ्या. टार्गेट १२० वर ठेवा आणि स्टॉपलॉस ७५ रुपये (क्लोजिंग बेसिस) ठेवा.
वक्रांगी : हा शेअर ३१.५० ते ३२.५० रुपयांना खरेदी करा, टार्गेट ३४ रुपये, ३६ रुपये, ३८ रुपये आणि ४० रुपये आणि स्टॉपलॉस २९.५० रुपयांवर ठेवा.
पैसालो डिजिटल : हा शेअर ५९.५० रुपये, ६२ रुपये आणि ६५ रुपयांचं लक्ष्य ठेवून ५५ ते ५७ रुपयांना खरेदी करा. स्टॉपलॉस ५३ रुपये ठेवा.
एनएएलसी : एनएएलसी ६० ते ६१.५० रुपयांना खरेदी करून टार्गेट ६३.७५ रुपये, ६६ रुपये, ६८ रुपये आणि ७० रुपयांपर्यंत ठेवा आणि स्टॉपलॉस ५८ रुपयांवर ठेवा.
संबंधित बातम्या