Share Market News in Marathi : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बाजार सावरलेला दिसला. आज तोच कल कायम राहणार की बदलणार याविषयी उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमित बागरिया आणि आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी आज इंट्राडे खरेदीसाठी ५ शेअर्स सुचवले आहेत.
बागरिया यांनी व्होल्टास लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा हे दोन शेअर घेण्याचा सल्ला दिला आहे. तर, गणेश डोंगरे यांनी टेक्समॅको रेल अँड इंजिनीअरिंग लिमिटेड, भारती एअरटेल लिमिटेड आणि एनसीसी लिमिटेड यांच्यावर विश्वास दाखवला आहे. जाणून घेऊया टार्गेट प्राइस व इतर माहिती
हा शेअर ८२६.९५ रुपये दराने खरेदी करा. टार्गेट १९५५ रुपये आणि स्टॉपलॉस १७६३ रुपये ठेवा.
का खरेदी करावा ? - ट्रेडिंग व्हॉल्यूममध्ये लक्षणीय वाढ मजबूत तेजीचे संकेत देत आहे. व्होल्टासनं १८५० रुपयांच्या प्रतिकार पातळीच्या वर आपलं स्थान कायम राखलं, तर तो शेअर १९५५ रुपयांच्या पुढील लक्ष्यापर्यंत जाऊ शकतो.
हा शेअर ३२९८ रुपयांच्या टार्गेटसह ३०८२ रुपयांना खरेदी करा. स्टॉपलॉस २९७४ रुपये ठेवा.
का खरेदी करावा ? - महिंद्रा अँड महिंद्रा सध्या ३०८२ रुपयांवर ट्रेड करत आहे. हा शेअर ३१०० ते २८८७ रुपयांच्या टप्प्यांतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
हा शेअर २०८ रुपयांच्या टार्गेट प्राइससाठी १९० रुपयांच्या स्टॉपलॉससह खरेदी करा.
खरेदी का करावा? - शेअरच्या नुकत्याच झालेल्या शॉर्ट टर्म ट्रेंड अॅनालिसिसमध्ये तो २०८ रुपयांच्या आसपास पोहोचू शकतो. हा शेअर सध्या १९० रुपयांच्या सपोर्ट लेव्हलवर आहे. सध्याचा बाजारभाव १९८ रुपये पाहता खरेदीची संधी आहे.
भारती एअरटेल लिमिटेड १५९५ रुपयांत खरेदी करा. १६३५ रुपयांच्या टार्गेटसाठी स्टॉपलॉस १५७० रुपये ठेवा.
खरेदी का करावा ? - या शेअरला जवळपास १५७० रुपयांवर मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळं हा शेअर १६३५ रुपयांवर जाऊ शकतो.
एनसीसी लिमिटेड २७८ रुपयांना खरेदी करा. २८७ रुपयांचं टार्गेट ठेवताना २७२ रुपये स्टॉपलॉस लावा.
खरेदी का कराल? - टेक्निकल पॅटर्ननुसार शेअरची किंमत २८७ रुपयांच्या आसपास पोहोचू शकते. सध्या हा शेअर २७२ रुपयांच्या सपोर्ट लेव्हलवर आहे. तो लवकरच २८७ रुपयांच्या पातळीवर परत येऊ शकतो. लॉन्गटर्म पोझिशन घेण्याचा विचार करा. स्टॉप लॉस २७२ रुपये सेट करा. याची टार्गेट प्राइस २८७ रुपये आहे.
संबंधित बातम्या