Stock Market Updates : शेअर बाजारासाठी उत्साहवर्धक ठरलेल्या २०२४ या वर्षाचा आज शेवटचा दिवस आहे. हा दिवस गोड व्हावा असाच शेअर बाजारातील ट्रेडर्सचा प्रयत्न असेल. या साऱ्यांसाठी आज खरेदी-विक्रीसाठी मार्केट एक्सपर्ट्सनी १० शेअर्स सुचवले आहेत.
एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा, हेन्सेक्स सिक्युरिटीजचे एव्हीपी-रिसर्च महेश एम ओझा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंट अँड सर्व्हिसेसचे रिसर्च हेड अंशुल जैन यांनी फायदा देऊ शकणारे शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. यात आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स, ऑलकार्गो लॉजिस्टिक्स, मॅनासिया, आयओबी आणि एसबीएफसी फायनान्स यांचा समावेश आहे. तर, सुमीत बागरिया यांनी केएनआर कन्स्ट्रक्शन, युनिव्हर्सल केबल्स, अशोका बिल्डकॉन, बजाज हेल्थकेअर आणि पिरामल फार्मा हे ५ शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
हा शेअर ५६ रुपयांना विका, ५३.७० रुपयांचे लक्ष्य ठेवा आणि ५७.५० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवायला विसरू नका.
हा शेअर ४९.६० रुपये विकून टाका, टार्गेट ४६.५० रुपये आणि स्टॉपलॉस ५०.८० रुपये ठेवा.
मनकासिया
हा शेअर ८२.५० रुपयांना खरेदी करा. ८७.५० रुपये टार्गेट ठेवा आणि ७९.५० रुपये स्टॉप लॉस ठेवा.
हा शेअर ८९.५० वर खरेदी करा. टार्गेट ९४.५० वर आणि ८७.५० (क्लोजिंग बेसिस) वर स्टॉप लॉस ठेवा.
इंडियन ओवरसीज बँकेचा शेअर ४८ ते ५० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ५२ रुपये, ५४ रुपये आणि ५५ रुपयांपर्यंत ठेवा. स्टॉपलॉस ४६ रुपयांवर लावा.
हा शेअर ३४०.४० रुपयांना खरेदी करा. लक्ष्य किंमत ३६५ रुपये आणि स्टॉप लॉस ३३० रुपये ठेवा.
युनिव्हर्सल केबल्सचा शेअर घेण्याची शिफारस बागरिया यांनी केली असून टार्गेट ९०० रुपये आणि स्टॉपलॉस ८१० रुपये आहे.
हा शेअर ३३३ रुपयांचं टार्गेट आणि ३०३ रुपये स्टॉप लॉस लावून खरेदी करा.
हा शेअर ५८७.८० रुपयांना खरेदी करा. टार्गेट ६३० रुपये आणि ५६५ रुपये स्टॉप लॉस ठेवा.
पिरामल फार्माचा शेअर २६५.३० रुपयांना खरेदी करा, लक्ष्य २८५ रुपये ठेवा आणि स्टॉप लॉस २५५ रुपये ठेवा.
संबंधित बातम्या