Sports Bikes: दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा 'या' ३ स्पोर्ट्स बाईक, किंमत दीड लाखांपेक्षा कमी!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sports Bikes: दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा 'या' ३ स्पोर्ट्स बाईक, किंमत दीड लाखांपेक्षा कमी!

Sports Bikes: दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा 'या' ३ स्पोर्ट्स बाईक, किंमत दीड लाखांपेक्षा कमी!

Oct 07, 2024 12:16 PM IST

Best Sports Bike Under 150000: दीड लाखांपेक्षा कमी किंमतीत स्पोर्ट्स बाइक खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा 'या' ३ स्पोर्ट्स बाईक
दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करा 'या' ३ स्पोर्ट्स बाईक

Best Sports Bike in Affordable Price: तरुणांमध्ये स्पोर्ट्स बाईकची वेगळीच क्रेझ आहे. यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या अपाची आणि पल्सर कंपनीच्या स्पोर्ट्स बाईकची मागणी वाढली आहे. दमदार इंजिन आणि स्पोर्टी लूकमुळे ग्राहक स्पोर्ट बाईककडे आकर्षित होतात. यासोबतच या बाइक्स दैनंदिन वापरासाठीही सर्वोत्तम मानल्या जातात. 

इतर बाईकच्या तुलनेत स्पोर्ट्स बाईकची किंमत अधिक असल्याने अनेकजण त्याकडे पाठ फिरवतात. अशा ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. बाजारात अशाही काही बाईक उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत दीड लाखांपेक्षा कमी आहे. दरम्यान, दीड लाखांपेक्षा कमी किंमतीत कोणत्या स्पोर्ट्स बाईक खरेदी केल्या जाऊ शकतात, हे जाणून घेऊयात.

बजाज पल्सर एनएस १६०

बजारात एक लाखांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या स्पोर्ट्स बाईकमध्ये बजाज कंपनीची बजाज पल्सर एनएस १६० चा समावेश आहे. या बाईकची सुरुवाती किंमत एक लाख २४ हजार रुपये आहे. या बाइकमध्ये १६० सीसी इंजिन मिळते. या बाइकचे सिंगल-सिलेंडर इंजिन १७ बीएचपी पॉवर आणि १४.६ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. ही बाईकची बाजारात उपलब्ध असलेल्या टीव्हीएस अपाची आरटीआर, हिरो एक्स्ट्रीम १६० आर, यामाहा एफ झेड एस आणि सुझुकी गिक्सरशी थेट स्पर्धा आहे.

यामाहा एफझेड-एस एफ आय

या यादीत यामाहा कंपनीची सोर्ट्स बाईक दुसऱ्या क्रमांकावर आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत १ लाख २८ हजार ९०० रुपये आहे. ही बाईक ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS), मागील डिस्क ब्रेकसह सिंगल चॅनेल ABS, मल्टी-फंक्शनल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी हेडलाइट, टायर हगिंग रिअर मडगार्ड, लोअर इंजिन गार्ड आणि ब्लूटूथ सक्षम व्हाय- कनेक्ट ॲप यांचा समावेश आहे.

टीव्हीएस अपाची आरटीआर १६०

टीव्हीएस अपाची आरटीआर १६० ही टीव्हीएस कंपनीची पहिली स्पोर्ट्स बाईक आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत १ लाख २६ हजार आहे. या बाइकमध्ये ग्राहकांना १६० सीसी सिंगल- सिलेंडर इंजिन मिळत आहे, जे १७.४ बीपीएच पॉवर आणि १४.७३ पीक टॉर्क जनरेट करते.या बाईकमध्ये सेगमेंट-फर्स्ट रॅम एअर कूलिंगची फीचर्स मिळतात. ही बाईक Fi वर ११४ किमी प्रतितास आणि कार्ब प्रकारात ११३ किमी प्रतितास इतका वेग प्राप्त करण्यास सक्षम आहे.

Whats_app_banner