घरबसल्या सिनेमाहॉलची मजा! डॉल्बी साऊंड असलेले स्मार्ट टीव्ही खरेदी करा अवघ्या १३ ते १५ हजारांत
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  घरबसल्या सिनेमाहॉलची मजा! डॉल्बी साऊंड असलेले स्मार्ट टीव्ही खरेदी करा अवघ्या १३ ते १५ हजारांत

घरबसल्या सिनेमाहॉलची मजा! डॉल्बी साऊंड असलेले स्मार्ट टीव्ही खरेदी करा अवघ्या १३ ते १५ हजारांत

Feb 04, 2025 04:03 PM IST

Best Smart TV: अवघ्या १३ ते १५ हजारांच्या आत नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

डॉल्बी साऊंड असलेले स्मार्ट टीव्ही खरेदी करा अवघ्या १३ ते १५ हजारांत
डॉल्बी साऊंड असलेले स्मार्ट टीव्ही खरेदी करा अवघ्या १३ ते १५ हजारांत

Best Smart TV With Dolby Audio: डॉल्बी साउंड असलेला स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत आहात, पण तुमचे बजेट १५ हजारांपेक्षा कमी आहे, अशा ग्राहकांच्या आनंदात भर घालणारी माहिती समोर आली. अ‍ॅमेझॉन इंडियावर सॅमसंग, एलजी आणि शाओमी कंपनीच्या स्मार्ट टीव्ही अवघ्या १३ ते १५ हजारांत उपलब्ध आहेत. या स्मार्ट टीव्हीमध्ये ग्राहकांना बेस्ट इन क्लास डिस्प्लेसह डॉल्बी ऑडिओ देण्यात आला आहे, त्यामुळे ग्राहकांना घरबसल्या सिनेमाहॉलची मजा मिळते, असा दावा स्मार्ट टीव्ही निर्मात्यांकडून करण्यात आला. 

१) एलजी ८० सेमी (३२ इंच) एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही ३२ एलएम ५६३ बीपीटीसी (डार्क आयर्न ग्रे)

अ‍ॅमेझॉन इंडियावर हा स्मार्ट टीव्ही १३ हजार ९९० रुपयांना उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये कंपनी ६० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह एचडी रेडी डिस्प्ले देत आहे. दमदार आवाजासाठी यात १० वॅटच्या आउटपुटसह डॉल्बी ऑडिओ सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये कंपनी डीटीएस व्हर्च्युअल: एक्स देखील ऑफर करत आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या वेबओएस टीव्हीमध्ये २ एचडीएमआय पोर्ट आणि १ यूएसबी पोर्ट देण्यात आले आहे. क्वाड कोर प्रोसेसरवर काम करणाऱ्या या टीव्हीमध्ये बिल्ट-इन वाय-फायदेखील आहे.

२) शाओमी स्मार्ट टीव्ही ए ८० सेमी (३२) एचडी रेडी स्मार्ट गुगल एलईडी टीव्ही एल३२एमए-ऐन (ब्लॅक)

अ‍ॅमेझॉनवर शाओमी कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही १४ हजार ९९० रुपयांना उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये कंपनी १३६६×७६८ पिक्सल रिझोल्यूशनअसलेला एचडी रेडी डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले ६० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. दमदार आवाजासाठी कंपनी टीव्हीमध्ये २० वॅटचे आउटपुट असलेला डॉल्बी ऑडिओ देत आहे. हा टीव्ही १.५ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज आहे. टीव्हीचे बेजललेस डिझाइन त्याचा लूक अधिक जबरदस्त बनवते. कनेक्टिव्हिटीसाठी टीव्हीमध्ये २ एचडीएमआय पोर्ट आणि २ यूएसबी पोर्ट आहेत.

३) सॅमसंग ८० सेंमी (३२ इंच) एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही UA32T4380AKXXL (ग्लॉसी ब्लॅक)

हा सॅमसंग टीव्ही अ‍ॅमेझॉन इंडियावर १४ हजार ९९० रुपयांना उपलब्ध आहे. टीव्हीमध्ये ग्राहकाला ६० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह एचडी रेडी डिस्प्ले मिळेल. हे २० वॅटचे साउंड आउटपुट देते. डॉल्बी डिजिटल प्लस टीव्हीची साउंड क्वालिटी मजबूत करण्याचे काम करते. यात २ एचडीएमआय पोर्ट आणि १ यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.

Whats_app_banner