Best FD Rates : 'या' पाच बँका मुदत ठेवींवर देतात सर्वाधिक व्याज; तुम्हाला माहीत आहेत का?-best fd rates these five banks offer the highest interest rates ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Best FD Rates : 'या' पाच बँका मुदत ठेवींवर देतात सर्वाधिक व्याज; तुम्हाला माहीत आहेत का?

Best FD Rates : 'या' पाच बँका मुदत ठेवींवर देतात सर्वाधिक व्याज; तुम्हाला माहीत आहेत का?

Sep 12, 2024 06:46 PM IST

Best FD Rates : मुदत ठेवी अर्थात एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम व्याजदर देणाऱ्या काही बँका आहेत. तिथं केलेली गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.

Best FD Rates : 'या' पाच बँका मुदत ठेवींवर देतात सर्वाधिक व्याज; जाणून घ्या सविस्तर
Best FD Rates : 'या' पाच बँका मुदत ठेवींवर देतात सर्वाधिक व्याज; जाणून घ्या सविस्तर

Best Bank FD Rates : निश्चित परतावा आणि सुरक्षितता या दोन वैशिष्ट्यांमुळं मुदत ठेवी (Fixed Deposits) हा भारतात गुंतवणुकीचा एक लोकप्रिय पर्याय आहे. त्यातही बँक एफडी हा लोकांच्या आवडीचा पर्याय असतो. त्यामुळं गुंतवणूक करताना गुंतवणूकदार कोणत्या बँकेत जास्त व्याजदर आहे याची चौकशी करताना दिसतात. अशांसाठी सर्वोत्तम व्याजदर देणाऱ्या बँकांची माहिती आम्ही देत आहोत.

बँकांशी संबंधित वेबसाइटवरील ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय स्टेट बँक (SBI), आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यासारख्या मोठ्या व पारंपारिक बँकांच्या तुलनेत भारतातील स्मॉल फायनान्स बँका मुदत ठेवींवर जास्तीत जास्त व्याज देतात. 

युनिटी बँक (८ जुलै २०२४ पासून)

 

सर्वसामान्य ग्राहकांसाठी

६ महिने ते २०१ दिवस - ८.५० टक्के

५०१ दिवस - ८.७५ टक्के

१००१ दिवस - ९ टक्के

७०१ दिवस - ८.७५ टक्के

ज्येष्ठ नागरिकांसाठी

६ महिने ते २०१ दिवस - ९ टक्के

५०१ दिवस - ९.२५ टक्के

१००१ दिवस - ९.२५ टक्के

१००१ दिवस - ९.५० टक्के

७०१ दिवस - ९.२५ टक्के

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक (२५ जून २०२४ पासून)

सर्वसामान्य ग्राहकांसाठी

५४६ ते ११११ दिवस -  ९ टक्के

१११२ ते १८२५ दिवस - ८ टक्के

ज्येष्ठ नागरिकांसाठी

५४६ ते ११११ दिवस - ९.५० टक्के

१११२ ते १८२५ दिवस - ८.५० टक्के

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (४ सप्टेंबर २०२४ पासून)

सर्वसामान्य ग्राहकांसाठी

२ वर्षे ते २ वर्षे १ दिवस - ८.६० टक्के

२ वर्षे आणि २ दिवस - ८.६५ टक्के

२ वर्षे ३ दिवसे ते ३ वर्षे -  ८.६० टक्के

ज्येष्ठ नागरिकांसाठी

२ वर्षे ते २ वर्षे १ दिवस - ९.१० टक्के

२ वर्षे आणि २ दिवस - ९.१० टक्के

२ वर्षे ३ दिवसे ते ३ वर्षे - ८.६० टक्के

शिवालिक स्मॉल फायनान्स बँक (२८ जून २०२४ पासून)

सर्वसामान्य ग्राहकांसाठी

१८ ते २४ महिने - ८.५५ टक्के

 ज्येष्ठ नागरिकांसाठी 

१८ ते २४ महिने - ९.०५ टक्के 

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक (१२ जून २०२४ पासून)

सर्वसामान्य ग्राहकांसाठी

४४४ दिवस - ८.५० टक्के

ज्येष्ठ नागरिकांसाठी

४४४ दिवस - ८.७७ टक्के

सर्वसामान्य ग्राहकांना एफडीवर सर्वाधिक व्याज नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक देतेय. ५४६ ते ११११ दिवसांसाठी ही बँक ९ टक्के व्याज देतेय. 

ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका

युनिटी बँक

१००१ दिवस - ९.५० टक्के.

नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक

५४६ ते ११११ - ९.५० टक्के.

स्मॉल फायनान्स बँकांमधील ठेवी सुरक्षित आहेत का?

डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) स्मॉल फायनान्स बँकांमध्ये असलेल्या मुदत ठेवींसाठी विमा संरक्षण देते. प्रत्येक ठेवीदाराला ५ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिलं जातं.

DICGC चं विमा संरक्षण बँकेला आहे की नाही याची पडताळणी कशी करावी?

डीआयसीजीसीअंतर्गत येणाऱ्या बँकांना विमा संरक्षणाची माहिती देणारी छापील पत्रके दिली जातात. ही पत्रकं बँकेच्या शाखांमध्ये लावलेली असतात. काही शंका असल्यास बँकेच्या शाखा अधिकाऱ्याशी चर्चा करता येते.

 

(तळटीप : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. गुंतवणुकीशी संबंधित कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या वैयक्तिक आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner