Viral news : बंगळुरूमधील दामत्य चांगल्या राहणीमानासाठी लक्झेंबर्ग या एका छोट्या युरोपियन देशात स्थलांतरित झाले. आता हे दामत्य असे जीवन जगत आहेत, ज्याचे बरेच लोक फक्त स्वप्न पाहत आहेत. मात्र, हे दाम्पत्य अजूनही भारतीय बाजारात गुंतवणूक करत आहे. 'लाइव्ह मिंट'शी बोलताना या दाम्पत्याने भारतापेक्षा युरोपमध्ये राहण्याचे कोणते फायदे आहेत, याबाबत सांगितले आहे.
प्रतीक गुप्ता आणि नेहा माहेश्वरी असे या दाम्पत्याचे नाव आहे. प्रतीक आणि नेह २०२० मध्ये लक्झेंबर्ग येथे स्थायिक झाले. प्रतीक अॅमेझॉनमध्ये वरिष्ठ विश्लेषक आहे. तर, नेहा एका जर्मन रिअल इस्टेट कंपनीत फायनान्स मॅनेजर म्हणून काम करते. एनआरआय दांपत्य मान्य करते की, भारतात त्यांना मोठी वेतनवाढ झाली असती किंवा अमेरिका किंवा दुबईतही जाऊन त्यांना अधिक कमाई करता आली असती. पण त्यांनी युरोपमधील लक्झेंबर्ग निवडले.
प्रतिक आणि नेहा त्यांच्या उत्पन्नापैकी २८ टक्के कर भरतात, जे भारतातील देय रकमेपेक्षा २-३ टक्के कमी आहे. परंतु, त्या बदल्यात त्यांना चांगल्या सुविधा मिळतात. 'आपल्या वैयक्तिक उत्पन्नाच्या तीन टक्के रक्कम आरोग्य विम्यासाठी देणे बंधनकारक आहे. केवळ तीन टक्के खर्चात दंतचिकित्सा वगळता आरोग्य सेवा आमच्यासाठी पूर्णपणे मोफत आहे,' असे नेहाने सांगितले. लक्झेंबर्ग कर आकारणीमध्ये बेरोजगारी निधीचा समावेश आहे, ज्यात ते उत्पन्नाच्या २ टक्के योगदान देण्यास बांधील आहेत. नेहा म्हणाली की, ‘या निधीअंतर्गत जर एखाद्याला कामावरून काढून टाकण्यात आले तर,सरकार शेवटच्या पगाराच्या ८० रक्कम दोन वर्षांसाठी किंवा दुसरी नोकरी मिळेपर्यंत देते. माझ्या वार्षिक उत्पन्नाच्या ५ टक्क्यावर मी दोन वेळा आपत्कालीन परिस्थिती पैसे मिळवले आहेत. मी एकदा वैद्यकीय कारणांसाठी आणि दुसऱ्यांदा नोकरी गमावल्यामुळे पैसे मिळवले आहेत. यासाठी मला स्वतंत्रपणे आपत्कालीन निधी उभारण्याची गरज भारली नाही.’
नेहा आणि प्रतीकसाठी लक्झेंबर्गमध्ये राहण्याचा आणखी एक फायदा सांगितला आहे. लक्झेंबर्गमध्ये युरोपियन सुट्ट्या आणि लक्झरी कारच्या किंमती खूपच कमी आहेत. त्यांच्याकडे मर्सिडीज बेंझ ए-क्लास कार आहे, ज्याची किंमत सुमारे ४३ हजार युरो आहे, जे ११ लाखाच्या आसपास आहे. मात्र, बेंगळुरूमध्ये अशाच एका कारची किंमत ५५ लाख रुपये आहे. प्रतीकने लाइव्ह मिंटशी बोलताना सांगितले की, ' मी भारतात ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची लक्झरी कार खरेदी करू शकणार नाही, परंतु जर्मन लक्झरी कार लक्झेंबर्गमध्ये खूपच स्वस्त आहेत माझ्या माझ्या उत्पन्नाच्या तुलनेत ही कार मला परवडणारी आहे.
हे दाम्पत्य त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या २० ते २५ टक्के गुंतवणूक करतात. भारत त्यांचे एकमेव गुंतवणूक केंद्र आहे. हे दाम्पत्य सुमारे ७० टक्के शेअर्समध्ये गुंतवतात. तर, २० टक्के म्युच्युअल फंडात आणि उर्वरित १० टक्के सुवर्ण, डिजिटल गोल्ड, भविष्य निर्वाह निधी आणि राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये गुंतवतात. प्रतीकने प्रकाशनाला सांगितले की, त्याला भारतीय शेअर बाजाराविषयी चांगली माहिती आहे. भारतीय शेअर बाजारात केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला नफा मिळवून देऊ शकते, असे प्रतिकला वाटते.