Smartwatch: महिलांसाठी जबरदस्त स्मार्टवॉच बाजारात! ब्लुटूथ कॉलिंग, फिटनेस फीचर्स आणि बरंच काही...-beatxp eva smartwatch for women with amoled display bluetooth calling metal body launched ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Smartwatch: महिलांसाठी जबरदस्त स्मार्टवॉच बाजारात! ब्लुटूथ कॉलिंग, फिटनेस फीचर्स आणि बरंच काही...

Smartwatch: महिलांसाठी जबरदस्त स्मार्टवॉच बाजारात! ब्लुटूथ कॉलिंग, फिटनेस फीचर्स आणि बरंच काही...

Jan 15, 2024 11:02 AM IST

New Ladies Smartwatch: महिलांसाठी नवीन स्मार्टवॉच बाजारात दाखल झाली आहे.

BeatXP  Smartwatch
BeatXP Smartwatch

BeatXP Eva: बीटएक्सपीने महिलांसाठी डिझाइन केलेले त्यांचे नवीन स्मार्टवॉच बीटएक्सपी ईवा लॉन्च केले आहे. कंपनीचे हे नवीन घड्याळ गोल डायल आणि मेटॅलिक बॉडीने सुसज्ज आहे. हे घड्याळ प्रीमिअम लूकसह बाजारात दाखल झाले आहे. या घड्याळात ब्लूटूथ कॉलिंग आणि फिटनेस मॉनिचरिंग फीचर्स देखील मिळतात. बीटएक्सपी ईवा घडळ्याची किंमत ४ हजार ४९९ रुपये इतकी आहे. वापरकर्ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून या घड्याळाची खरेदी केली जाऊ शकते.

कंपनी या घड्याळात १.२ इंचाचा AMOLED डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले २०० पेक्षा जास्त वॉच फेससह येतो. वापरकर्ते आपपली स्टाईल आणि आवडीनुसार डिस्प्ले सेट करू शकतात. या घड्याळात इन-बिल्ट माइक आणि इंटरएक्टिव्ह डायल पॅडसह ब्लूटूथ कॉलिंग मिळत आहे. या घड्याळात फोनमधील यादी देखील दिसते. बीटएक्सपी ईवा स्मार्टवॉचमध्ये फिटनेससाठी अनेक महत्त्वाचे फीचर्स देण्यात आली आहेत.

या घड्याळात हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 सह स्लीप मॉनिटरिंगचा देखील समावेश आहे. वॉचमध्ये १०० हून अधिक स्पोर्ट्स मोड देखील मिळत आहे. घड्याळ IP68 रेटिंगसह येते, जे ते पाणी आणि धूळ प्रतिरोधक बनवते. हे घड्याळ १.५ मीटर खोली ३० मिनिटांपर्यंत पाणी सहन करू शकते. बीटच्या या नवीन मॉडेलमध्ये एआय व्हॉईस असिस्टंटची सुविधा देखील देण्यात आली, ज्यामुळे ते फोनसोबत जोडून हँड्स-फ्री वापरता येईल. कंपनी रीअल टाईम वेदर अपडेट, म्युझिक कंट्रोल आणि इन्स्टंट नोटिफिकेशन्स यासारखे फीचर्स वॉचमध्ये देत आहे. या घड्याळाची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर ५ दिवस चालते.

सॅमसंग, वनप्लसला टक्कर देण्यासाठी येतोय 'हा' गेमिंग स्मार्टफोन

सॅमसंग, वनप्लसला टक्कर देण्यासाठी एससने रोग फोन ८ मालिका लॉन्च केली आहे. या मालिकेत फोन ८ आणि रोग फोन ८ प्रो यांचा समावेश आहे. एसस फोन ८ प्रोच्या १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९४ हजार ९९९ रुपये आहे. तर, २४ जीबी रॅम आणि एक टीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंटसाठी ग्राहकांना १ लाख १९ हजार ९९९ रुपये खर्च करावे लागतील. फोनच्या लॉन्चिंगबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. भारतीय ग्राहक या फोन्सची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

विभाग