yber crime : सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. बड्या कंपन्या आणि विविध ब्रँडने आपल्या वार्षिक ऑफर्स सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे ई-शॉपिंग पोर्टलवर तुम्हाला या आकर्षक ऑफर्स अगदी सहज मिळतील. मोठ्या प्रमाणात नागरिक ऑनलाइन शॉपिंगला पसंती देत आहेत. भारतात ऑनलाइन शॉपिंग करणारा मोठा वर्ग असून सायबर चोरटे आता अशा ग्राहकांना लक्ष्य करू लागले आहे. जर ऑनलाइन शॉपिंग करतांना सावधगिरी बाळगली नाही तर, तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. सायबर ठग बनावट वेबसाइट तयार करून खरेदीदारांची फसवणूक करण्याच्या तयारीत आहेत.
वेबसाइटची सत्यता कशी तपासावी : ऑनलाइन शॉपिंग करताना कधीही घाई करू नका. वेबसाइटची सत्यता तपासण्यासाठी, यूआरएल लिंक आणि डोमेन नाव तपासा.
स्पेलिंग तपासा : अनोळखी नावावरून पाठवलेला ई-मेल उघडून वेबसाईट उघडण्यापूर्वी त्यावर लिहिलेल्या मजकुराचे स्पेलिंग नक्की तपासा. सहसा साईटवर फेक ई-मेल आणि स्पेलिंग चुकीचे लिहिले जाते व बनावट वेबसाइट तयार केली जाते.
कोणतीही खरेदी करू नका : वेबसाईटवर वस्तूची माहिती, त्याचे रेटिंग आणि कस्टमर केअर नंबर नसेल तर अशा वेबसाईटवरून कोणतीही खरेदी करू नका.
मेसेज आणि ओटीपी काळजीपूर्वक वाचा : ऑनलाइन पेमेंट करताना मोबाईल किंवा मेलवर आलेले मेसेज आणि ओटीपी काळजीपूर्वक वाचा. मालाची डिलिव्हरी होईपर्यंत ते हाताशी ठेवा.
तक्रार करण्यास उशीर करू नका : फसवणूक झाल्यास लवकरात लवकर तक्रार दाखल करा. त्यामुळे त्वरित कारवाई होण्याची शक्यता वाढते.
लिंक डाऊनलोड करू नका : कोणतेही शॉपिंग अॅप अधिकृत अॅप स्टोअरमधूनच डाऊनलोड करा. कोणीही पाठवलेल्या लिंकवरून ते डाऊनलोड करू नका.
अधिकृत क्रमांकावर तक्रार नोंदवा : ज्या अॅपवरून तुम्ही शॉपिंग केली आहे, त्याच अॅपवर जाऊन दिलेल्या ई-मेल आणि कस्टमर सर्व्हिस नंबरवर तक्रार नोंदवा. दुसऱ्या सर्च इंजिनवर कस्टमर केअर नंबर शोधण्याची चूक करू नका.
किंमतींमध्ये प्रचंड फरक बहुतांश दिसतो. अनेकदा अशा वेबसाइट महागड्या वस्तूंच्या किमतीत मोठी सूट देतात. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन नसल्यामुळे बनावट वेबसाईटवर कंपनीचा पत्ता किंवा कस्टमर केअर देखील नसतो. पेमेंटची संशयास्पद पद्धत बनावट ई-शॉपिंग वेबसाइट्स बहुतेक यूपीआयचा पर्याय देतात. पेमेंट करताना कंपनीचे नव्हे तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव पुढे येत असतात.
ऑनलाइन फसवणूक झाली असेल तर ताबडतोब तक्रार दाखल करा. अनेकदा लोकांना सायबर फसवणुकीची तक्रार कोठे करावी हे समजत नाही किंवा अनेकदा लोक पोलिस ठाण्यात जाणे टाळतात, परंतु सायबर फसवणुकीची तक्रार ही तुम्ही ऑनलाइन दाखल करू शकता. यासाठी तुम्ही https//www.cybercrime.gov.in या साईटला भेट देऊ शकता किंवा राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक १९३० (पूर्वी हा क्रमांक १५५२६० होता) वर फोन करून तक्रार नोंदवू शकता.
● प्रथम वेबसाइटचे डोमेन नाव तपासा. यूआरएलमध्ये https आहे याची खात्री करा, http असल्यास त्यानंतर साइटचे स्पेलिंग देखील तपासा.
● डोमेन कोणाच्या नावावर आहे हे तपासण्यासाठी https//www. whois.com वर जा. सर्च बॉक्समध्ये संबंधित वेबसाइटची यूआरएल लिंक टाका. यामुळे त्या संकेतस्थळाची संपूर्ण माहिती मिळेल.
● ग्राहक scamadviser.com इतर वेबसाइटवर जाऊन ही कंपनीची विश्वासार्हता रेटिंग जाणून घेऊ शकतात. यावरून कंपनी खरेदी करण्यासाठी किती सुरक्षित आहे, हे दिसून येईल.
संबंधित बातम्या