मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bank Holidays in April : बँकांची कामे करा पटापट पूर्ण, एप्रिलमध्ये इतके दिवस राहणार बँका बंद

Bank Holidays in April : बँकांची कामे करा पटापट पूर्ण, एप्रिलमध्ये इतके दिवस राहणार बँका बंद

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 23, 2023 05:05 PM IST

Bank Holidays in April : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँकाची कामे करायची असतील तर त्याचे नियोजन आत्ताच करुन घ्या. कारण एप्रिल महिन्यात बँका इतके दिवस बंद राहणार आहेत. यादी इथे चेक करा

Bank Holidays in APril HT
Bank Holidays in APril HT

Bank Holidays in April : जर तुम्हाला तुमचे कोणतेही काम बँकेत जाऊन पूर्ण करायचे असेल तर ते ३१ मार्चपूर्वीच पूर्ण करा. कारण आर्थिक वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात शनिवार रविवारीही बँका सुरु राहणार आहेत. मात्र त्यानंतर एप्रिलमध्ये बँका १५ दिवस बंद राहणार आहेत. ग्राहकांना अडचणीतून वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते.

बँका बंद झाल्यामुळे अनेक आर्थिक कामकाजावर त्याचा परिणाम दिसून येतो. अशा परिस्थितीत ग्राहकांना अडचणीतून वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. एप्रिल महिन्यात विविध सण, जयंती आणि शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांसह एकूण १५ दिवस बँका बंद राहणार आहेत.

इअर एंडर, गुड फ्रायडे, महावीर जयंती, आंबेडकर जयंती आदी कारणांमुळे एप्रिल महिन्यात अनेक दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेत चेक जमा करणे, पैसे काढणे इत्यादी कोणत्याही महत्त्वाच्या कामे करणार असाल तर त्यापूर्वी एप्रिल महिन्यातील सुट्ट्यांची आरबीआयने जाहीर केलेली ही यादी नक्की पहा.

१ एप्रिल - वार्षिक बंदमुळे शिलाँग, शिमला आणि चंदीगड वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहील.

२ एप्रिल - रविवारमुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.

४ एप्रिल - अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर आणि रांची येथे महावीर जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.

५ एप्रिल - बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त हैदराबादमध्ये बँका बंद राहतील.

७ एप्रिल - गुड फ्रायडेमुळे आगरतळा, अहमदाबाद, गुवाहाटी, जयपूर, जम्मू, शिमला आणि श्रीनगर वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

८ एप्रिल - दुसऱ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहतील.

९ एप्रिल - रविवारमुळे देशभरातील बँका बंद राहतील.

१४ एप्रिल - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे भोपाळ, नवी दिल्ली, रायपूर, शिलाँग आणि शिमला वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.

१५ एप्रिल - आगरतळा, गुवाहाटी, कोची, कोलकाता, शिमला आणि तिरुवनंतपुरममध्ये विशू, बोहाग बिहू, हिमाचल डे, बंगाली नववर्षामुळे बँका बंद राहतील.

१६ एप्रिल - रविवारमुळे बँकांना सुट्टी असेल.

१८ एप्रिल - शब-ए-कदर जम्मू आणि श्रीनगरमधील बँक बंद राहील.

२१ एप्रिल - ईद-उल-फित्रमुळे आगरतळा, जम्मू, कोची, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.

२२ एप्रिल - ईद आणि चौथ्या शनिवारमुळे अनेक ठिकाणी बँका बंद राहतील.

२३ एप्रिल - रविवारी बँका बंद राहतील.

३० एप्रिल - रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग