
मुंबई - देशातील बँक कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दोन दिवस संपावर जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसंदर्भात बँक कर्मचारी सरकार दरबारी आवाहन करत आहेत. मात्र त्यातून तोडगा निघाला नसल्याने बँक कर्मचारी आता येत्या३० जानेवारीपासून दोन दिवसांच्या संपावर जात आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनच्या (एआयबीईए) कडून संपाची घोषणा केली आहे. या महिन्याच्या ३० व ३१ जानेवारी रोजी हा संप असणार आहे.
या संपामुळे लोकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. तो टाळण्यासाठी आतापासूनच तुम्हाला बँकांची कामे आटोपून घ्यावी लागतील. संप दोन दिवसांचा असला तर बँका चार दिवस बंद राहणार आहेत. यादरम्यान एटीएममध्ये कॅश संपण्यासारखा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही आधीच पैसे काढून ठेवा. २८ व २९ रोजी चौथा शनिवार व रविवार असल्याने बँका बंद असतार तर ३० व ३१ जानेवारी रोजी संपामुळे बँकांना टाळे असेल. बँका त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी उघडतील. संपादरम्यान एटीएममध्ये कॅश संपणे, चेक क्लीअर न होणं अशा काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहेत. या कालावधीमध्ये इंटरनेट बँकिंग सुरू असेल.
त्यामुळे तुम्हालाही या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम करायची असतील तर या तारखा लक्षात ठेवाव्या लागतील. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) या बँक संघटनांच्या संघटनेने संपाची हाक दिली आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या यूएफबीयूच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
संबंधित बातम्या
