Bank of Maharashtra Apprentice Recruitment 2024: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र येथे अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरून bankofmaharashtra.in येथे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत ६०० पदे भरण्यात येणार आहेत.
या भरतीसाठी कालपासून (१४ ऑक्टोबर २०२४) नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२४ आहे. उमेदवारांनी प्रथम नॅट्स पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
यूआर / ईडब्ल्यूएस / ओबीसी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क १५० रुपये + जीएसटी आहे, एससी / एसटी प्रवर्गासाठी अर्ज शुल्क १०० रुपये + जीएसटी आहे आणि पीडब्ल्यूबीडी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.