बँक ऑफ बडोदामध्ये १२०० हून जास्त पदांची भरती; अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  बँक ऑफ बडोदामध्ये १२०० हून जास्त पदांची भरती; अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

बँक ऑफ बडोदामध्ये १२०० हून जास्त पदांची भरती; अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस

Jan 27, 2025 09:58 AM IST

Bank of Baroda SO Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदाच्या जागांसाठी भरती केली जाणार आहे. तब्बल १२६७ जागांवर ही भरती होणार आहे. या पदासाठी आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे.

'बँक ऑफ बरोडा'मध्ये १२६७ जागांवर नोकर भरती! अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, असा भरा अर्ज
'बँक ऑफ बरोडा'मध्ये १२६७ जागांवर नोकर भरती! अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, असा भरा अर्ज

Bank of Baroda SO Recruitment 2025 : बेरोजगारांसाठी महत्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने स्पेशालिस्ट ऑफिसरच्या तब्बल १२६७ जागांवर भरती जाहीर केली आहे. या पदासाठी आज ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बँकेच्या www.bankofbaroda.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावर अर्ज करता येणार आहे.

बँक ऑफ बडोदाच्या विविध शाखांमध्ये कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, अधिकारी सुरक्षा विश्लेषक, विकासक आणि इतर पदांवर उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या साठी बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार त्यांची त्या पदावर नियुक्ती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा:

या पदासाठी पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदवी, एमबीए/पीजीडीएम, सीए/सीएफए/सीएमए पदवी ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच बीई आणि बीटेक पदवी धारक देखील या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. या पदासाठी २४ ते ३४ वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली गेली आहे.

अशी राबबवली जाणार निवड प्रक्रिया:

अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे. या सोबतच त्यांची गट चर्चा(ग्रुप डिस्कशन) देखील घेतले जाणार आहे. यानंतर त्यांची वैयक्तिक मुलाखत देखील घेतली जाणार आहे. या सर्व टप्प्यातउण उत्तीर्ण उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

शुल्क:

या परीक्षेसाठी सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस मधील उमेदवारांना ६०० रुपये तर SC/ST/PWBD, महिला उमेदवारांना १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

वेतन

या पोस्टसाठी ६७१६० ते १३५०२० प्रति महिना वेतन राहणार आहे.

अशी होऊन परीक्षा

या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत तर्काचे २५ प्रश्न विचारले जाणार असून ते प्रत्येकी १ म्हणजेच २५ गुणांचे असतील. तर २५ प्रश्न ही इंग्रजी भाषेतून विचारले जातील. त्यांना देखील प्रत्येकी एक असे २५ गुण देण्यात येणार आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडवर २५ प्रश्न विचारले जातील. तर व्यावसायिक ज्ञानावर ७५ प्रश्न विचारले जातील. हे १५० गुणांचे असतील. हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला १५० मिनिटांचा अवधी दिला जाणार आहे.

असा करा अर्ज

बँकेची अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर जा. येथे मुख्यपृष्ठावर, 'करिअर' टॅबवर क्लिक करा. यानंतर नवीन पृष्ठ उघडल्यावर, 'करंट ओपनिंग्ज' टॅबवर क्लिक करा. 'विविध विभागांवर नियमितपणे व्यावसायिकांची भरती' या लिंकवर क्लिक करा. या ठिकाणी तुमची नोंदणी करा आणि फॉर्म भरा. फी भरा व फॉर्म सबमिट करा. त्याची प्रिंट आऊट घेऊन जवळ ठेवा.

Whats_app_banner