मराठी बातम्या  /  बिझनेस  /  BOB FD Interest : बँक आँफ बडोदाच्या व्याजदरात वाढ, ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा

BOB FD Interest : बँक आँफ बडोदाच्या व्याजदरात वाढ, ज्येष्ठ नागरिकांना मोठा फायदा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 20, 2023 07:59 PM IST

Bank of Baroda FD Interest News : बँक ऑफ बडोदा सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक करण्यासाठी ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीत एफडी योजना चालवते.

fixed deposit HT
fixed deposit HT

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाने गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळविण्याची संधी देत ​​मुदत ठेव योजनांवरील व्याजदरांमध्ये सुधारणा केली आहे. बँकेने ज्येष्ठ नागरिकांना ७.०५ टक्के ते ७.५५ टक्के व्याजदर मिळण्याची संधी दिली आहे. नवीन व्याजदर १७ मार्च २०२३ पासून लागू करण्यात आले आहेत.

बँक ऑफ बडोदा एफडी व्याज दर

बँक ऑफ बडोदा सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक करण्यासाठी ७ दिवसांपासून ते १० वर्षांच्या कालावधीत एफडी योजना चालवते. बँकेच्या नवीनतम व्याजदरांनुसार, बँक सामान्य नागरिकांना ७ ते ४५ दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर ३ टक्के व्याजदर देत आहे. ४६ दिवस ते १८० दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर ४.५ टक्के व्याजदर दिला जाईल. त्यानुसार १८१ दिवस ते २१० दिवसांच्या मुदतीच्या एफडीसाठी बँक ५.२५ टक्के व्याजदर देईल. २११ दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ५.७५ टक्के व्याजदर उपलब्ध असेल. एक वर्ष ते तीन वर्षांच्या एफडीसाठी बँक ६.७५ टक्के व्याजदर देईल. त्याच वेळी, बँक तीन वर्षे ते १० वर्षे कालावधीच्या एफडीवर ६.५ टक्के व्याजदर देत आहे.

ज्येष्ठांसाठी बँक ऑफ बडोदा एफडी व्याजदर

बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांसाठी ७ ते ४५ दिवसांच्या दरम्यान परिपक्व होणाऱ्या एफडीवर ३.५ टक्के व्याजदर ऑफर करते. ४६ दिवस आणि १८० दिवसात परिपक्व होणाऱ्या एफडीवर ५% व्याज देते. १८१ ते २१० दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर ५.७५ टक्के व्याज दिले जाईल, २११ दिवस आणि एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीसाठी ६.२५ टक्के व्याज जाहीर केले आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना एक वर्ष ते तीन वर्षांपर्यंतच्या एफडीवर ७.२५ टक्के व्याजदर मिळू शकतो. बँक ऑफ बडोदा तीन वर्षे ते पाच वर्षांच्या एफडीवर सर्वाधिक ७.१५ टक्के आणि पाच वर्षे ते १० वर्षांच्या एफडीवर ७.५ टक्के व्याजदर देत आहे.

WhatsApp channel

विभाग