Bank Holiday in July 2024 : जुलै महिन्यात मोहरम वगळता कोणतेही मोठे सण नाहीत. असं असूनही या महिन्यात देशाच्या विविध भागात एकूण १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारचा आणि रविवारच्या सुट्टीचाही समावेश आहे.
जुलै २०२४ मध्ये बँका कधी आणि कुठे बंद राहतील, जाणून घेऊया सविस्तर माहिती…
जुलै महिन्यात बँकांना पहिली सुट्टी ३ जुलै रोजी आहे. बेहदीनखलाममुळे या दिवशी शिलाँगमध्ये बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल. ६ जुलै रोजी एमएचआयपी डेमुळे आयझॉलमध्ये बँका बंद राहतील. त्यानंतर रविवार, ७ जुलै रोजी देशभरातील बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल. ८ जुलै रोजी इम्फाळमधील कांगमध्ये बँका बंद राहतील.
द्रुक्पा त्शे-झी मुळे ९ जुलै रोजी गंगटोकमध्ये बँका बंद राहतील. १६ जुलै रोजी हरेलामुळे डेहराडूनमध्ये बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल. मोहरमचा सण १७ जुलै रोजी आहे. यामुळं अगरतला, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, जम्मू, लखनौ, कोलकाता, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, श्रीनगर इथं बँका बंद राहतील. मात्र, तिरुवनंतपुरम, पणजी, कोची, कोहिमा, इटानगर, इंफाळ, गुवाहाटी, गंगटोक, डेहराडून, भुवनेश्वर, चंदीगड मध्ये या दिवशी बँका सुरू राहतील.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी जाहीर केली जाते. महिन्याचा पहिला रविवार ७ जुलैला आहे. १४, २१ आणि २८ जुलै रोजी रविवार असल्यानं देशभरातील बँका बंद राहणार आहेत. तर १३ आणि २७ जुलै रोजी दुसरा आणि चौथा शनिवार असल्यानं बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे.
जुलै महिन्यात बँका १२ दिवस बंद असल्या तरी या काळात बँकांच्या ऑनलाइन सुविधा सुरू राहतील. गरजेच्या वेळी ग्राहकांना विनाअडथळा या सेवांचा लाभ घेता येणार आहे.
संबंधित बातम्या