bank holidays in august : ऑगस्ट महिन्यात तब्बल १३ दिवस बँका बंद राहणार, तारखा आताच लिहून ठेवा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  bank holidays in august : ऑगस्ट महिन्यात तब्बल १३ दिवस बँका बंद राहणार, तारखा आताच लिहून ठेवा!

bank holidays in august : ऑगस्ट महिन्यात तब्बल १३ दिवस बँका बंद राहणार, तारखा आताच लिहून ठेवा!

Updated Jul 31, 2024 10:36 AM IST

bank holidays in august 2024 : ऑगस्ट महिना हा हिंदू कॅलेंडरनुसार सणासुदीचा श्रावण महिना असतो. त्यामुळं या महिन्यात बँका बरेच दिवस बंद राहणार आहेत.

ऑगस्ट महिन्यात तब्बल १४ दिवस बंद राहणार बँक, तारखा लिहून घ्या!
ऑगस्ट महिन्यात तब्बल १४ दिवस बंद राहणार बँक, तारखा लिहून घ्या!

bank holidays in august 2024 : जुलै महिन्याचा हा शेवटचा दिवस असून उद्यापासून ऑगस्ट महिना सुरू होत आहे. हिंदू कॅलेंडरप्रमाणे याच महिन्यात श्रावण मास सुरू होणार आहे. हा महिना सणासुदीचा असतो. त्यामुळं या महिन्यात सुट्ट्यांची रेचलेल आहे. या महिन्यात तब्बल १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळं काही कामं असतील तर आत्ताच नियोजन करून ठेवावं लागणार आहे.

ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनापासून रक्षाबंधन आणि जन्माष्टमीपर्यंत अनेक सण आहेत. स्वातंत्र्य दिनाची सुट्टी पकडून एकूण १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवार साप्ताहिक सुट्टीचा समावेश आहे. जाणून घेऊया ऑगस्टमध्ये बँका कधी बंद राहतील.

ऑगस्ट २०२४ मधील बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

३ ऑगस्ट : केर पूजा - आगरतळामध्ये बँका बंद राहतील.

४ ऑगस्ट (रविवार) - साप्ताहिक सुट्टी.

८ ऑगस्ट (गुरुवार) - तेंडोंग लो रम फाट - सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.

१० ऑगस्ट (शनिवार) - दुसरा शनिवार.

११ ऑगस्ट (रविवार) - साप्ताहिक सुट्टी.

१३ ऑगस्ट (मंगळवार) - देशभक्त दिन - मणिपूरमध्ये बँका बंद राहतील.

१५ ऑगस्ट (गुरुवार ) स्वातंत्र्य दिन/पारशी नववर्ष - भारतात सर्व बँका बंद आहेत.

१८ ऑगस्ट (रविवार) - साप्ताहिक सुट्टी.

१९ ऑगस्ट (सोमवार) - रक्षाबंधन/झूलना पूर्णिमा/ वीर विक्रम किशोर माणिक्य बहादूर वाढदिवस - त्रिपुरा, गुजरात, ओडिशा, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद राहतील.

२० ऑगस्ट - श्री नारायण गुरु जयंतीनिमित्त बँका बंद राहतील.

२४ ऑगस्ट - चौथा शनिवार

२५ ऑगस्ट (रविवार) - साप्ताहिक सुट्टी.

२६ ऑगस्ट (सोमवार) - जन्माष्टमी (श्रावण वड-८) / कृष्ण जयंती साजरी केली जाते. या दिवशी गुजरात, ओरिसा, चंदीगड, तामिळनाडू, उत्तराखंड, सिक्कीम, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, जम्मू, उत्तर प्रदेश, बंगाल, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि श्रीनगरमध्ये बंद राहतील.

राज्यनिहाय सुट्ट्यांमध्ये बदल

राष्ट्रीय सणांच्या व्यतिरिक्त प्रत्येक राज्यातील तिथल्या विशेष सणांनुसार बँकांच्या सुट्ट्या बदलतात. त्यामुळं आपल्या आर्थिक व्यवहारांचे नियोजन करण्यासाठी आणि शेवटच्या क्षणी गोंधळ आणि आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी जवळच्या बँक शाखेतून सुट्ट्यांची खातरजमा केली पाहिजे. आरबीआय आणि राज्य सरकारे राष्ट्रीय आणि स्थानिक उत्सव, धार्मिक समारंभ आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम लक्षात घेऊन बँकांच्या सुट्ट्यांची यादी तयार करतात. मध्यवर्ती बँक आपल्या अधिकृत वेबसाइट आणि बँका आणि इतर वित्तीय संस्थांना अधिसूचनेद्वारे ही घोषणा करते.

Whats_app_banner