April month bank holidays : १ एप्रिल पासून २०२४-२५ हे नवे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. या आर्थिक वर्षाच्या कामात बँकेचे कर्मचारी गुंतले आहेत. दरम्यान, अनेक सण, उत्सवामुळे एप्रिल महिन्यात काही दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये असलेल्या सणांच्या सुट्ट्यांसह शनिवार, रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश या सुट्ट्यांमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे बँकेची कामे पटापट संपवावी लागणार आहे. बँक बंद असल्यास ऑनलाइन बँकिंग व्यवहाराला प्राधान्य द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आरबीआयने एप्रिलमहिन्यात असलेल्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या बाबत बँकेच्या संकेत स्थळावर माहिती देण्यात आली आहे. एप्रिलमध्ये बँकांना १४ दिवस सुट्ट्या आहेत. यात सणांच्या सुट्ट्यांसह शनिवार, रविवारच्या साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे सुट्ट्यांची ही यादी पाहून बँकेची कामे करावी लागणार आहे.
१ एप्रिल २०२४ : वार्षिक अकाउंट क्लोझिंगमुळे देशभरातल्या बँका बंद होत्या.
५ एप्रिल : बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन आणि जमात उल विदाच्या निमित्ताने तेलंगण, जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत.
९ एप्रिल : गुढीपाडवा, उगाडी फेस्टिव्हल तेलुगू न्यू इयर आणि चैत्र नवरात्राच्या पहिल्या दिवसानिमित्ताने बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, इम्फाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, हैदराबाद, पणजी आणि श्रीनगरमध्ये बँकांना सुट्या राहणार आहेत.
१० एप्रिल : रमजान ईदच्या निमित्ताने कोची आणि केरळमध्ये बँका बंद राहणार आहेत.
११ एप्रिल : ईद उल फित्रच्या निमित्ताने चंडीगड, गंगटोक, कोची वगळता देशभर बँका बंद राहणार आहेत.
१५ एप्रिल : बोहाग बिहू आणि हिमाचल दिवसाच्या निमित्ताने गुवाहाटी आणि सिमलामध्ये बँका बंद राहणार आहेत.
१७ एप्रिल : रामनवमीच्या निमित्ताने चंडीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, पाटणा, रांची, शिमला, मुंबई, जयपूर, कानपूर, लखनौ आणि नागपूरमध्ये बँकांना सुट्टी देण्यात आल्याने बँका बंद राहणार आहेत.
२० एप्रिल : गरिया पूजेच्या दिवशी आगरतळ्यात बँका बंद राहणार आहेत.
७ एप्रिलला रविवार, १३ एप्रिलला दूसरा शनिवार, १३ एप्रिलला रविवार, २१ एप्रिलला रविवार, २७ एप्रिलला महिन्याच्या चौथ्या शनिवारी तर २८ एप्रिलला रविवार असल्याने देखील बँका बंद राहणार आहेत. सुट्यांच्या दिवशी एटीएम सुरू राहणार आहे. तर नागरिकांना ऑनलाइन, यूपीआय, मोबाइल बँकिंगने त्यांची कामे करता येणार आहे.