मराठी बातम्या  /  Business  /  Bank Holiday On Eid Banks Will Remain Closed In These Cities Today And Tomorrow In Most Cities From Jaipur

Bank Holidays on Eid : बँकांना ईदची सुट्टी नेमकी कधी? आजची स्थिती काय?

bank Holodays HT
bank Holodays HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
Apr 21, 2023 11:24 AM IST

Bank Holidays on Eid : आरबीआयच्या बँक हाॅलीडे लिस्ट २०२३ नुसार, ईदसाठी बँका २२ एप्रिलला सुट्टी असणार आहे. दरम्यान, ईद - उल- फितरमुळे काही क्षेत्रात बँका आज म्हणजे २१ एप्रिलला बंद राहतील.

Bank Holidays on Eid : ईद उल फितरच्या दिवशी शनिवारी भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात बँका बंद राहतील. आरबीआयच्या बँक हाॅलीडे लिस्ट २०२३ नुसार, बँकांना २२ एप्रिलला सुट्टी देण्यात आली आहे.ल दरम्यान, ईद - उल -फितर (रमजान ईद) /गरिया पुजा/ जुमात - उल- विदानुसार काही भागात बँका आज २१ एप्रिलला बंद राहतील.

ट्रेंडिंग न्यूज

ईद कधी आहे ?

ईद उल फितर २०२३ भारतात २२ एप्रिलला साजरा केला जाणार आहे. जेंव्हा देशात चंद्र दिसेल आणि तेंव्हा ईद का चाँद रात्री २१ एप्रिलला साजरी केली जाईल. या दरम्यान संयुक्त अरब अमीरात आणि सऊदी अरबमध्ये शुक्रवारी साजरी केली जाईल.

सर्व खाजगी आणि सरकारी बँका राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी बंद असतात. त्यात स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी जयंती यांचा समावेश आहे. राष्ट्रीय आणि सरकारी सुट्ट्यांसह भारतात बँका प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतात. जर महिन्यात पाच शनिवार असतील तर त्या शनिवारी बँका चालू असतील.

आज २१ एप्रिलला या शहरात बँका बंद

जम्मू, कोच्चि, श्रीनगर, अगरतला, तिरुवनंतपुरम

२२ एप्रिलला या शहरांमध्ये बँका राहणार बंद

जयपूर, जम्मू, कानपूर, बेलापूर, भोपाल, चेन्नई, देहरादून, पटना, गुवाहाटी, हैदराबाद, आंध्र प्रदेश, हैदराबाद - तेलंगाना, इम्फाल, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, रायपूर, रांची, शिलाँग, श्रीनगर

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग