Bank Holiday news marathi : वर्षातील शेवटचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात सुट्ट्या संपवण्यासाठी कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची लगबग असते. त्यासाठी बँक हॉलिडेला जोडून सुट्ट्या टाकल्या जातात. ही शोधाशोध करणाऱ्यांसाठी खास बातमी आहे. यंदा डिसेंबर महिन्यात तब्बल १७ दिवस बँका बंद राहणार आहेत.
सण-उत्सव, दुसरा आणि चौथा शनिवार आणि वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील सर्व रविवार मिळून विविध राज्यांमध्ये १७ दिवस बँका बंद असतील. तसंच, बँकेच्या सुट्टीच्या दिवशी नेहमीप्रमाणे ऑनलाइन वित्तीय सेवा उपलब्ध राहणार आहे. या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात एकूण ५ रविवार आहेत. भारतातील बँकांच्या सुट्ट्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या असल्यानं आपण सुट्ट्यांची यादी आपल्या बँकेच्या शाखेतून किंवा आरबीआयच्या वेबसाइटवरून घ्यावी.
१ डिसेंबर- रविवार (संपूर्ण भारत)
३ डिसेंबर- शुक्रवार- सेंट फ्रान्सिस झेवियर्सची मेजवानी (गोवा)
८ डिसेंबर- रविवार (संपूर्ण भारत)
१२ डिसेंबर- मंगळवार- पा-टोगन नेंगमिन्झा संगमा (मेघालय)
१४ डिसेंबर- दुसरा शनिवार (संपूर्ण भारत)
१५ डिसेंबर- रविवार (संपूर्ण भारत)
१८ डिसेंबर- बुधवार- यू सोसो थाम (मेघालय) यांची पुण्यतिथी
१९ डिसेंबर- गुरुवार- गोवा मुक्ती दिन (गोवा)
२४ डिसेंबर - मंगळवार - ख्रिसमस पूर्वसंध्येला (मिझोराम, नागालँड आणि मेघालय)
२५ डिसेंबर - बुधवार - ख्रिसमस (संपूर्ण भारत)
२६ डिसेंबर - गुरुवार - ख्रिसमस सेलिब्रेशन (मिझोराम, नागालँड आणि मेघालय)
२७ डिसेंबर - शुक्रवार - ख्रिसमस सेलिब्रेशन (मिझोराम, नागालँड आणि मेघालय)
२८ डिसेंबर - चौथा शनिवार (संपूर्ण भारत)
२९ डिसेंबर - रविवार (संपूर्ण भारत)
३० डिसेंबर - सोमवार - यू कियांग नांगबाह (मेघालय)
३१ डिसेंबर - मंगळवार - नववर्षाची पूर्वसंध्या / लोसोंग / नामसून (मिझोराम)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्टच्या तरतुदींनुसार, बँकेचे वार्षिक सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर करते. या सूचीबद्ध सुट्ट्यांच्या दिवसात थेट व्यवहार करता येत नाहीत.
आरबीआय आणि राज्य सरकारे राष्ट्रीय आणि स्थानिक प्रसंग, इतर गरजा, धार्मिक समारंभ आणि इतर सांस्कृतिक विधी विचारात घेऊन बँकांसाठी सुट्ट्यांची यादी तयार करतात. मध्यवर्ती बँक आपल्या अधिकृत वेबसाइट आणि बँका आणि इतर वित्तीय संस्थांना अधिसूचनेद्वारे ही घोषणा करते.