अरेरे... जेव्हा बँक कर्मचाऱ्याच्या चुकीने भलत्याच खात्यात ट्रान्सफर झाले तब्बल 2000,000,0000 कोटी रुपये, पुढं काय घडलं?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अरेरे... जेव्हा बँक कर्मचाऱ्याच्या चुकीने भलत्याच खात्यात ट्रान्सफर झाले तब्बल 2000,000,0000 कोटी रुपये, पुढं काय घडलं?

अरेरे... जेव्हा बँक कर्मचाऱ्याच्या चुकीने भलत्याच खात्यात ट्रान्सफर झाले तब्बल 2000,000,0000 कोटी रुपये, पुढं काय घडलं?

Dec 08, 2024 07:00 PM IST

Money Transfer : जर्मनीत एका बँक कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे तब्बल २००० कोटी रुपये चुकीच्या खात्यात ट्रान्सफर झाले. त्यानंतर बँकेने सुपरवायझरला नोकरीवरून काढून टाकले. आता जर्मन कोर्टाने या संपूर्ण प्रकरणावर निकाल दिला आहे.

बँक कर्मचाऱ्याच्या चुकीने ट्रान्सफर झाले २ हजार कोटी
बँक कर्मचाऱ्याच्या चुकीने ट्रान्सफर झाले २ हजार कोटी

२०१२ मध्ये जर्मनीतील एका बँकेतील लिपिकाच्या छोट्याशा चुकीमुळे दोन हजार कोटी रुपये ट्रान्सफर झाले. जर्मन बँकेतील हा क्लार्क कामाच्या वेळीच झोपी गेला. त्याचवेळी त्याचा हात संगणकाच्या की बोर्डवर पडला आणि चुकून २२२,२२२,२२२.२२.२२ युरो ट्रान्सफर केले. ही रक्कम २००० कोटी रुपयांच्या बरोबरीने होती, यावरून या चुकीचं गांभीर्य लक्षात येतं. मात्र, हा व्यवहार एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आला आणि त्याने वेळीच तो दुरुस्त केला. गेल्या काही काळापासून या घटनेची ऑनलाइन चर्चा सुरू आहे.

आता का होत आहे याची चर्चा -

ही चूक करणाऱ्या लिपिकाच्या पर्यवेक्षकानेही कागदपत्रांची नीट तपासणी न करता रक्कम मंजूर केली, या चुकीमुळे पर्यवेक्षकाला बँकेकडून बडतर्फ करण्यात आले. व्यवहार नीट न तपासल्याने बँकेने कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले होते. परंतु या संपूर्ण प्रकरणाबाबत पर्यवेक्षक न्यायालयात गेले. ज्यावर जर्मन न्यायालयाने आपला निकाल दिला आहे.

कोर्टाने सुपरवायझरच्या बाजुने दिला निकाल -

जर्मनीच्या न्यायालयाने पर्यवेक्षकाच्या बाजूने निकाल दिला आहे. पर्यवेक्षकाला हटविण्याचा हा निर्णय योग्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. एका दिवसात १०० हून अधिक व्यवहारांचा आढावा घ्यावा लागतो. त्यासाठी वेळेचेही दडपण असते. असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. त्या दिवशी पर्यवेक्षकाने ८१२ कागदपत्रांचा आढावा घेतला. एवढ्या कामाच्या दरम्यान काळजीपूर्वक काम करायला फारच कमी जागा शिल्लक होती.

पर्यवेक्षकाने केलेले हे कृत्य दुर्भावनापूर्ण नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच हे घोर निष्काळजीपणाचे प्रकरण असल्याचे दिसत नाही. बरखास्त करण्याऐवजी इशारा पुरेसा ठरला असता, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने त्या कर्मचाऱ्याला पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले आहेत.

घटनेवर ऑनलाइनही चर्चा -

या घटनेवर ऑनलाइन अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेमुळे बँकेच्या अंतर्गत त्रुटी दिसून आल्याचे अनेकांनी सांगितले. बँकेच्या केवळ पर्यवेक्षकालाच दोष देण्याच्या निर्णयावर ही लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर काही जणांनी पर्यवेक्षकावर अन्याय केल्याचं म्हटले आहे. काही म्हणतात की हे पर्यवेक्षकाचे काम आहे आणि ते त्यांनी नीट करायला हवं.

Whats_app_banner