Banco Products Bonus Issue : स्मॉलकॅप कंपनी बॅन्को प्रॉडक्ट्स (इंडिया) लिमिटेडच्या शेअर्स तेजीच्या लाटेवर स्वार झाले आहेत. शुक्रवारी बीएसईवर बॅन्को प्रॉडक्ट्स (इंडिया) चा शेअर १० टक्क्यांनी वधारून ११३०.९५ रुपयांवर पोहोचला. अवघ्या ७ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ६१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
बँको प्रॉडक्ट्सच्या शेअरमधील तेजीमागे बोनस शेअर्सची घोषणा हे एक प्रमुख कारण मानलं जात आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं अलीकडंच १:१ या प्रमाणात बोनस शेअर देण्याची शिफारस केली आहे. म्हणजेच कंपनीच्या शेअरहोल्डर्सना प्रत्येक एका शेअरमागे १ बोनस शेअर मिळणार आहे. बॅन्को प्रॉडक्ट्स १७ वर्षांनंतर पहिल्यांदाच बोनस शेअर्सचे देत आहे.
बॅन्को प्रॉडक्ट्सच्या शेअरमध्ये ७ दिवसांत ६१ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. स्मॉलकॅप कंपनीचा शेअर १३ नोव्हेंबर २०२४ रोजी ७०० रुपयांवर होता. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी बॅन्को प्रॉडक्ट्सचा शेअर ११३०.९५ रुपयांवर पोहोचला. गेल्या पाच दिवसांत बँको प्रॉडक्ट्सचे समभाग ४० टक्क्यांनी वधारले आहेत. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ८०६ रुपयांवर होता. आज तो ११३०.९५ रुपयांवर पोहोचला. शुक्रवारी कंपनीच्या समभागांनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ५०५.३५ रुपये आहे.
गेल्या पाच वर्षांत बॅन्को प्रॉडक्ट्स (इंडिया) लिमिटेडच्या शेअरमध्ये १०८२ टक्के वाढ झाली आहे. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी कंपनीचा शेअर ९५.६५ रुपयांवर होता. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी बॅन्को प्रॉडक्ट्सचा शेअर ११३०.९५ रुपयांवर पोहोचला. गेल्या चार वर्षांत कंपनीचे समभाग ८५३ टक्क्यांनी वधारले आहेत. तर, गेल्या दोन वर्षांत बॅन्को प्रॉडक्ट्सचे समभाग ४४८ टक्क्यांनी वधारले आहेत.
बँक प्रॉडक्ट्स (इंडिया) लिमिटेडनं तब्बल १७ वर्षांनंतर बोनस शेअरची घोषणा केली आहे. कंपनीनं यापूर्वी ऑगस्ट २००७ मध्ये बोनस शेअर्सचं वाटप केलं होतं. त्यावेळी कंपनीनं १:१ या प्रमाणात बोनस शेअरची घोषणा केली होती. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक एका शेअरमागे १ बोनस शेअर दिला होता.