Sugar Stocks : इथेनॉल दरवाढीचा निर्णय केंद्र सरकारनं घेताच साखर कंपन्याचे शेअर झेपावले!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Sugar Stocks : इथेनॉल दरवाढीचा निर्णय केंद्र सरकारनं घेताच साखर कंपन्याचे शेअर झेपावले!

Sugar Stocks : इथेनॉल दरवाढीचा निर्णय केंद्र सरकारनं घेताच साखर कंपन्याचे शेअर झेपावले!

Jan 29, 2025 06:15 PM IST

Sugar Stocks Rises : इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचा थेट परिणाम साखर कंपन्यांच्या शेअरच्या भावावर झाला आहे. हे शेअर्स चांगलेच वधारले आहेत.

Sugar Stocks : इथेनॉल दरवाढीचा निर्णय केंद्र सरकारनं घेताच साखर कंपन्याचे शेअर उसळले!
Sugar Stocks : इथेनॉल दरवाढीचा निर्णय केंद्र सरकारनं घेताच साखर कंपन्याचे शेअर उसळले!

Sugar Stocks News in Marathi : केंद्र सरकारनं इथेनॉलच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केल्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. या निर्णयाचा फायदा साखर कंपन्यांना होण्याची शक्यता असल्यानं या कंपन्याचे शेअर आज चांगले उसळले.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, सी-ग्रेड गुळापासून (एक्स-मिल) मिळणाऱ्या इथेनॉलची किंमत १.६९ रुपयांनी वाढवून ५७.९७ रुपये प्रतिलिटर होणार आहे. या बातमीमुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात सूचीबद्ध साखरेच्या शेअर्सवर नाराजी व्यक्त केली. ही बातमी येताच गुंतवणूकदार साखर कंपन्यांच्या शेअरवर तुटून पडले. त्याचा परिणाम शेअर्सचे भाव वाढण्यात झाला.

किती आणि कशी आहे दरवाढ?

बी ग्रेड जड गुळ आणि उसाचा रस/साखर/गुळापासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे दर अनुक्रमे ६०.७३ रुपये आणि ६५.६१ रुपये प्रति लिटर कायम ठेवण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं (सीसीईए) घेतला. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. त्यानुसार, सरकारनं इथेनॉल पुरवठा वर्ष २०२४-२५ साठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना इथेनॉल खरेदी किंमतीत सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे.

कोणते शेअर वाढले?

आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीजचा शेअर ५.७९ टक्क्यांनी वधारून ३५५.१० रुपयांवर बंद झाला. बलरामपूर चिनी मिलच्या शेअरचा भाव ४९६.१० रुपये आहे. हा शेअर आदल्या दिवसाच्या तुलनेत ३.४५ टक्क्यांनी वधारून बंद झाला. श्री रेणुका शुगर्सचा शेअर ५.७६ टक्क्यांनी वधारून ३७.८५ रुपयांवर बंद झाला.

बजाज हिंदुस्थान शुगर लिमिटेडचा शेअर ३.२२ टक्क्यांनी वधारून २७.२६ रुपयांवर बंद झाला. तर, बन्नरी अम्मान शुगर्सचा शेअर ६.३२ टक्क्यांनी वधारून ३६२९ रुपयांवर पोहोचला. धामपूर शुगर मिल्सचा शेअर ७.३७ टक्क्यांनी वधारून १५२.९५ रुपयांवर बंद झाला.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner