Share market news : शेअर बाजारात सध्या तेजीचा माहौल असून या तेजीच्या लाटेवर अनेक कंपन्या स्वार झाल्या आहेत. बजाज स्टील इंडस्ट्रीजही यास अपवाद नाही. या कंपनीनं गेल्या सहा महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले असून आता बोनस शेअर्स देण्याचा विचार सुरू आहे. हा कंपनीचा पहिला बोनस आहे.
बजाज स्टील इंडस्ट्रीजचा शेअर सोमवारी १७ टक्क्यांनी वधारून २९७८ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या समभागांनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या ३ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. यात बोनस शेअर्स जारी करण्याबाबत विचार केला जाईल. संचालक मंडळानं बोनस शेअर्सचा प्रस्ताव मंजूर केल्यास बोनस शेअर्स देण्याची कंपनीची ही पहिलीच वेळ असेल.
बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या समभागांनी सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या ६ महिन्यांत १३५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १ एप्रिल २०२४ रोजी कंपनीचा शेअर १२२२.९० रुपयांवर होता. ३० सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २,९७८ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांत बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये ६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २९७८ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १००४.०५ रुपये आहे.
बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गेल्या ५ वर्षात २५०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ४ ऑक्टोबर २०१९ रोजी कंपनीचा शेअर १०८.५० रुपयांवर होता. ३० सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २९७८ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ४ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये १३०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या २ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ३० सप्टेंबर २०२२ रोजी बजाज स्टील इंडस्ट्रीजचा शेअर ५७९.८५ रुपयांवर होता. तोच शेअर आज २९७८ रुपयांवर पोहोचला आहे.
कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ४८.२७ टक्के, बजाज स्टील इंडस्ट्रीजमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ४८.२७ टक्के आहे. ही शेअरहोल्डिंग ची आकडेवारी जून २०२४ तिमाहीच्या अखेरपर्यंतची आहे. कंपनीत कोणत्याही म्युच्युअल फंडाचा हिस्सा नाही.