पाच वर्षात २७०० टक्के नफा देणारी कंपनी देणार बोनस शेअर्सची भेट; गुंतवणूकदारांची झुंबड
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  पाच वर्षात २७०० टक्के नफा देणारी कंपनी देणार बोनस शेअर्सची भेट; गुंतवणूकदारांची झुंबड

पाच वर्षात २७०० टक्के नफा देणारी कंपनी देणार बोनस शेअर्सची भेट; गुंतवणूकदारांची झुंबड

HT Marathi Desk HT Marathi
Nov 01, 2024 02:54 PM IST

Bajaj Steel Industries : बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडनं गुंतवणूकदारांना घसघशीत बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शेअर सुस्साट सुटला आहे.

पेनी स्टॉक पल्सर इंटरनॅशनल
पेनी स्टॉक पल्सर इंटरनॅशनल

Bajaj Steel Industries : बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडचे शेअर्स पुढील आठवड्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. गुरुवारी कंपनीचा शेअर ४ टक्क्यांनी वधारून ३,२९४.०५ रुपयांवर बंद झाला. बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडनं ३ ऑक्टोबर रोजी ३:१ बोनस जारी करण्याची शिफारस केली होती. त्यासाठी १२ नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.

बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडच्या समभागांनी गेल्या ६ महिन्यांत गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. या काळात शेअरमध्ये १५३ टक्के वाढ झाली असून आता कंपनी दिवाळीनंतर बोनस शेअर देण्याच्या तयारीत आहे. बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडने १२ नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. या तारखेला ज्यांच्या डीमॅट खात्यात शेअर असतील, त्यांना बोनस शेअर्सचा लाभ मिळेल. कंपनीचे मार्केट कॅप १७१२.९१ कोटी रुपये आहे. कंपनीचा आरओई २४.३८ आणि पीई २१.३४ आहे.

काय म्हणाली कंपनी?

बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडने २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सेबीला कंपनीच्या निर्णयाची माहिती दिली आहे. ३ऑक्टोबर २०२४ च्या आमच्या मागील नोटीसनुसार आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४२ नुसार संचालक मंडळाच्या बैठकीत व भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर बोनस शेअर वाटप केलं जाणार आहे. त्यासाठी १२ नोव्हेंबर २०२४ ही तारीख 'रेकॉर्ड डेट' म्हणून निश्चित करण्यात आली आहे.

बजाज स्टील इंडस्ट्रीजच्या समभागांनी वर्षभरात २११ टक्के परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत १९० टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या २ वर्षात २५० टक्क्यांची वाढ झाली आहे. बजाज स्टील इंडस्ट्रीज लिमिटेडचा शेअर गेल्या ५ वर्षात २७०० टक्क्यांनी वाढला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner