Bajaj vs Pulsar: बजाज पल्सर एनएस २०० की हिरो एक्सट्रीम २०० एस 4 व्ही, कोणती बाईक खरेदी करावी?-bajaj pulsar ns200 vs hero xtreme 200s 4v which one to choose ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bajaj vs Pulsar: बजाज पल्सर एनएस २०० की हिरो एक्सट्रीम २०० एस 4 व्ही, कोणती बाईक खरेदी करावी?

Bajaj vs Pulsar: बजाज पल्सर एनएस २०० की हिरो एक्सट्रीम २०० एस 4 व्ही, कोणती बाईक खरेदी करावी?

Mar 05, 2024 01:05 PM IST

200cc Bikes: बजाज ऑटोने काही िवसांपूर्वीच भारतात अद्ययावत पल्सर एनएस 200 लाँच केली आहे, जी टीव्हीएस अपाचे आरटीआर 200 4 व्ही आणि हिरो एक्सट्रीम 200 एस 4 व्ही सारख्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करणार आहे.

Bajaj Auto launched the updated Pulsar NS200 in India just a few days ago, which comes with revising its competition with rivals like TVS Apache RTR 200 4V and Hero Xtreme 200S 4V.
Bajaj Auto launched the updated Pulsar NS200 in India just a few days ago, which comes with revising its competition with rivals like TVS Apache RTR 200 4V and Hero Xtreme 200S 4V.

Bajaj vs Pulsar: बजाज ऑटोने पल्सर एनएस २०० चे अपडेटेड व्हर्जन काही दिवसांपूर्वीच भारतात लाँच केले . या बाईकची किंमत १ लाख ५७ हजार ४२७ रुपये आहे. नवीन बजाज पल्सर एनएस २०० एनएस १२५ आणि एनएस १६० सह इतर एनएस सीरिज सह लाँच करण्यात आली होती. 

गेल्या काही वर्षांत भारतभर मोठ्या क्षमतेच्या प्रीमियम मोटारसायकलींची मागणी वाढली आहे. नवीन युगातील ग्राहक १०० ते १२५ सीसी सेगमेंटची निवड करण्याऐवजी २०० सीसी आणि त्यापेक्षा जास्त श्रेणीतील मोटारसायकल खरेदीकरण्यावर भर देत आहेत. बजाज ऑटोने हा ट्रेंड कॅश करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बजाज पल्सर एनएस २०० साठी हे सोपे काम नाही. कारण, ही मोटारसायकल काही कडव्या प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करते. बजाज मोटारसायकलची स्पर्धा टीव्हीएस अपाचे आरटीआर २०० ४ व्ही आणि हिरो एक्सट्रीम २०० एस ४ व्ही या प्रतिस्पर्ध्यांशी आहे.

किंमत

नुकत्याच लाँच झालेल्या बजाज पल्सर एनएस २०० ची एक्स शोरूम किंमत १ लाख ५७ हजार रुपये (एक्स-शोरूम किंमत) आहे. तर, हिरो एक्सट्रीम २०० एस ४ व्हीची एक्स शोरूम किंमत १ लाख ४१ हजार रुपये आहे. बजाज पल्सर एनएस २०० ची किंमत हिरो एक्सट्रीम २०० एस ४ व्हीच्या तुलनेत थोडी जास्त आहे.

फीचर्स

नवीन बजाज पल्सर एनएस २०० मध्ये १९९.५ सीसी, सिंगल सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. सहा स्पीड ट्रान्समिशनसह ई-२० कम्प्लायंट इंजिन ९ हजार ७५० आरपीएमवर २४.१३ बीएचपी पॉवर आणि ८,००० आरपीएमवर १८.७४ एनएम टॉर्क जनरेट करते.

Samsung Galaxy S23 Ultra: अ‍ॅमेझॉनवर सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा 5G च्या खरेदीवर भरघोस सूट

दुसरीकडे, हिरो एक्सट्रीम २०० एस ४ व्ही मध्ये १९९.६ सीसी सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे  ८ हजार ५०० आरपीएमवर १८.८ बीएचपी पीक पॉवर आणि ६ हजार ५०० आरपीएमवर १७.३५ एनएम टॉर्क जनरेट करते. या इंजिनला फाइव्ह स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. बजाज पल्सर एनएस २०० हिरो मोटोकॉर्पच्या एक्सट्रीम २०० एस ४ व्हीच्या तुलनेत अधिक पॉवर आणि थोडा जास्त टॉर्क प्रदान करते.

Whats_app_banner
विभाग