Bajaj Platina New Bikes: लोकप्रिय कॉम्पॅक्ट कम्युटर बाइक बजाज प्लॅटिना ११० आता नव्या अवतारात बाजारात दाखल झाली आहे. ही बाईक नव्या डिझाईनसह बाजारात दाखल झाली आहे. बाईकमधील ११० सीसी इंजिनमुळे दुचाकीस्वारचा प्रवास आणखी चांगला होतो. शहरासह ग्रामीण भागात ही बाईक चालवण्याचा आनंद घेता येणार आहे. बजाज प्लॅटिना ११० आरामदायी आणि कार्यक्षम अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
बजाज प्लॅटिना ११० ही त्याच्या विभागातील सर्वोत्तम बाइक्सपैकी एक आहे. भक्कम मायलेज, उत्कृष्ट कामगिरी आणि नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही बाईक बाजारात धुमाकूळ घालत आहे. बजाज प्लॅटिना ११० एबीएस आणि बजाज प्लॅटिना ११० ड्रम अशा दोन व्हेरिएंटमध्ये बाईक बाजारात उपलब्ध आहे. दोन्ही बाईक अनेक बाबींमध्ये समान आहेत.
ही बाईक अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टमसह आली आहे. बजाज प्लॅटिना ११० एबीएस ही भारतातील पहिली ११५ सीसी बाईक आहे, जी एबीएस तंत्रज्ञानासह येते. या बाईकमध्ये सिंगल चॅनल एबीएससह पुढील बाजूस २४० मिमी डिस्क आणि सीबीएस टेक्नोलॉजीसह मागील बाजूस ११० मिमी ड्रम ब्रेक आहे, ज्यामुळे ती आणखी शक्तिशाली बनते. बजाज प्लॅटिना ११० एबीएसमध्ये डीआरएल दिवे मिळत आहेत, जे तुम्हाला स्पष्ट दृश्यमानता देतात. ज्यामुळे रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याचा प्रवास करताना कोणतीही अडचण येत नाही. ही एक हलकी बाईक आहे, तिचे वजन फक्त ११७ किलो आहे. बजाज प्लॅटिना ११० त्याच्या मायलेजसाठी देशभरात ओळखले जाते. वाढत्या पेट्रोलच्या किमतींमध्ये त्यांचा वेळ आणि पैसा वाचवण्याचे हे एक प्रमुख कारण आहे.
बजाज प्लॅटिना ११० ड्रम बाईक सीसी ४ स्ट्रोक इंजिनसह येते. ही बाईक किफायतशीर आणि कमी खर्चात चांगले मायलेज देणारे इंजिन टेक्नोलॉजीसह येते. या बाइकमध्ये ड्रम ब्रेक सिस्टम मिळते. बाईकच्या प्रभावी मायलेजमुळे लांबच्या प्रवासातही चालकाचे पैसे वाचणार आहेत.
बजाज प्लॅटिना ११० च्या दोन्ही प्रकारांनी बाजारात खळबळ उडवून दिली. दोन्ही प्रकार परवडणाऱ्या किंमतीच्या श्रेणीत येतात. तुम्हाला गुंतवणुकीचे योग्य मूल्य देतील. आजच तुमच्या जवळच्या बजाज ऑटो शोरूमला भेट द्या किंवा बजाज ऑटो वेबसाइटला भेट द्या. तसेच टेस्ट राइड बुक करा.
संबंधित बातम्या