Bajaj Chetak Blue 3202: बजाज चेतक ब्लू ३२०२ भारतात दाखल, जाणून घ्या किंमत आणि खासियत-bajaj chetak blue 3202 launched in india at rs 1 15 lakh ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Bajaj Chetak Blue 3202: बजाज चेतक ब्लू ३२०२ भारतात दाखल, जाणून घ्या किंमत आणि खासियत

Bajaj Chetak Blue 3202: बजाज चेतक ब्लू ३२०२ भारतात दाखल, जाणून घ्या किंमत आणि खासियत

Aug 31, 2024 07:22 PM IST

Bajaj Chetak Blue 3202 Launched: बजाज चेतक ब्लू ३२०२ आज भारतीय बाजारात लॉन्च झाली आहे. या स्कूटरची किंमत आणि फीचर्सबाबत जाणून घेऊयात.

बजाज चेतक ब्लू ३२०२ भारतात दाखल
बजाज चेतक ब्लू ३२०२ भारतात दाखल

Bajaj Chetak Blue 3202 Launched In India: बजाज ऑटोने चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन व्हेरियंट प्रॉडक्ट वेबसाइटवर लिस्ट केले आहे. नवीन बजाज चेतक ब्लू भारतीय बाजारात लॉन्च झाली असीून त्याची एक्स-शोरूम किंमत १.१५ लाख रुपये इतकी आहे.  बजाज ऑटोने चेतक ब्लू ३२०२ इलेक्ट्रिक स्कूटर ब्रुकलिन ब्लॅक, सायबर व्हाईट, इंडिगो मेटॅलिक आणि मॅट ग्रे या चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकच्या बुकींगला सुरुवात झाली असून ग्राहक अवघ्या दोन हजारात स्कूटर बूक करू शकतात.

बजाज चेतक ब्लू ३२०२: रेंज

बजाज चेतक ३२०२ मध्ये ३.२ किलोवॅटचा मोठा बॅटरी देण्यात आली आहे, जो प्रीमियम व्हेरियंटवरही उपलब्ध आहे. नवीन बॅटरी सेलमुळे ही रेंज १२६ किमीवरून १३७ किमीपर्यंत वाढली आहे. इतर सर्व व्हेरियंटप्रमाणेच बजाज चेतक ३२०२ सोबत टेकपॅकची अतिरिक्त किंमतीत विक्री करत आहे.

बजाज चेतक ब्लू ३२०२: फीचर्स

नवीन चेतक ब्लू ३२०२ मध्ये एलईडी हेडलॅम्पसह हॉर्सशूच्या आकाराचे एलईडी डीआरएल, कनेक्टिव्हिटी फीचर्स, टीएफटी इंस्ट्रूमेंट कंसोल, ऑल मेटल बॉडी, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि बरेच काही देण्यात आले आहे. यात लाइटेड स्विचगिअर, सॉफ्ट-क्लोज सीट, रिव्हर्स फंक्शन आणि स्मार्ट की देखील देण्यात आली आहे. या मॉडेलमध्ये स्पोर्ट आणि क्रॉल मोडव्यतिरिक्त जास्तीत जास्त रेंज साठी इको मोड देण्यात आला आहे. टेकपॅकमध्ये हिल होल्ड आणि रोल-ओव्हर डिटेक्शन अशी वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत. नवी बजाज चेतक ब्लू ३२०२ अथर रिझटा, ओला एस १ एअर, टीव्हीएस आयक्यूब आणि तत्सम इतर फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर्सशी कडवी टक्कर देऊ शकेल.

बजाज चेतक २९०१: स्पेसिफिकेशन्स

चेतक २९०१ मध्ये हिल होल्ड, रिव्हर्स, स्पोर्ट आणि इकॉनॉमी मोड, कॉल आणि म्युझिक कंट्रोल, फॉलो मी होम लाइट्स आणि ब्लूटूथ अॅप कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स देणारे टेकपॅक देखील तुम्हाला मिळू शकते. यात रेड, व्हाईट, ब्लॅक, लाइम यलो आणि अॅज्युर ब्लू असे ५ कलर ऑप्शन आहेत. चेतक २९०३ मध्ये २.९ केडब्ल्यूएच बॅटरी मिळेल, जी एकदा चार्ज केल्यावर १२३ किलोमीटरपर्यंत धावेल. तर,२९०१ व्हेरियंटमध्ये फास्ट चार्जिंगची सुविधा नाही. हे फीचर्स 2903 मध्ये दिले जाऊ शकतात, अशी अपेक्षा आहे. नवीन चेतक २९०३ ई-स्कूटरची एक्स-शोरूम किंमत सुमारे १.२ लाख रुपये असू शकते. येत्या काही आठवड्यांत लाँच केले जाऊ शकते.

विभाग