मराठी बातम्या  /  Business  /  Axis Bank Revises Fixed Deposit Rates

Axis: अ‍ॅक्सिस बँकेचा ग्राहकांना झटका; एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्याला मिळणार फक्त इतकेच व्याज!

axis bank HT
axis bank HT
Ashwjeet Rajendra Jagtap • HT Marathi
Sep 17, 2023 09:22 PM IST

Axis Bank New FD Rates:अ‍ॅक्सिस बँकेने एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

Axis Bank fixed deposit Rates: अ‍ॅक्सिस बँकेच्या ठेवीदारांसाठी महत्त्वाची माहिती आहे. अ‍ॅक्सिस बँकेने मुदत ठेव म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटवर व्याजदर कमी केले. मर्यादित कालावधीसाठी बँकेकडून कपात करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

ट्रेंडिंग न्यूज

अ‍ॅक्सिस बँक त्यांच्या ठेवीदारांना मुदत ठेवीवर ३ टक्के ते ७.१० टक्के व्याज देते. अ‍ॅक्सिस बँकेकडून दोन कोटींपेक्षा कमी मुदत ठेवीवर ग्राहकांना चांगले व्याज दिले जाते. तर, एका वर्षासाठी मुदत ठेवीवर ६.७ टक्के व्याज मिळते. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, नवे व्याज दर १५ सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या मुदत ठेवीवर नव्या व्याजदराचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे बँकेकडून स्पष्ट करण्यात आले.

अॅक्सिस बँकेच्या नव्या व्याजदरानुसार, ७ दिवसांपासून १० वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीवरील व्याजदर ३ टक्के- ७.१० पर्यंत वाढवण्यात आले. ठेवीदार ऑनलाईन पद्धतीने ५ हजार एफडीमध्ये गुंतवू शकतात. तर, बँकेत गेल्यानंतर ठेवीदारांना किमान एफडीमध्ये किमान १० हजार ठेवावी लागतील.

अॅक्सिस बँकेचा एफडीवर नवीन व्याजदर

- ७ ते २९ दिवसांसाठी ३ टक्के व्याजदर

- ३० ते ४५ दिवसांसाठी ३.५ टक्के व्याजदर

- ४६ ते ६० दिवसांसाठी ४.२५ टक्के व्याजदर

- ६१ दिवसापासून ३ महिन्यापर्यंत ४.२५ टक्के व्याजदर

-३ महिन्यापासून ६ महिन्यापर्यंत ४.७५ टक्के व्याजदर

- ६ महिन्यापासून ९ महिन्यापर्यंत ५.७५ टक्के व्याजदर

- ९ महिन्यापासून एक वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ६ टक्के व्याजदर

- एका वर्षापासून १५ महिन्यापर्यंत ६. ७० टक्के व्याजदर

- १५ महिन्यापासून ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी ७.१० टक्के व्याजदर

- ५ वर्षांपासून १० वर्षांपर्यंत ७ टक्के व्याजदर

विभाग