मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Easy To EV: इलेक्ट्रिक वाहनांबाबतच्या अफवांना पूर्णविराम लागणार, टाटा मोटर्सची 'इजी टू ईव्ही' मोहिम सुरू

Easy To EV: इलेक्ट्रिक वाहनांबाबतच्या अफवांना पूर्णविराम लागणार, टाटा मोटर्सची 'इजी टू ईव्ही' मोहिम सुरू

Jun 08, 2024 02:26 PM IST

Tata Motors Launched Easy To EV Campaign: कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने 'इजी टू ईव्ही' मोहिम सुरू केली आहे.

इलेक्ट्रिक वाहनाबाबत ग्राहकांमध्ये अनेक गैरसमज आहेत.
इलेक्ट्रिक वाहनाबाबत ग्राहकांमध्ये अनेक गैरसमज आहेत.

Tata Motors: भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरकर्त्यांमध्ये लक्षणीय वाढ झालीय. मात्र, अद्यापही मोठ्या संख्येत ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांपेक्ष इंधनावर चालणारे वाहन खरेदी करतात. इलेक्ट्रिक वाहन किती त्रासदायक आहेत, हे दाखवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना ग्राहक १० वेळा विचार करतात. अशा ग्राहकांच गैरसमज दूर करण्यासाठी आणि त्यांना इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारतातील आघाडीची कार निर्माता कंपनी टाटा मोटर्सने 'इजी टू ईव्ही' ही मोहिम सुरू केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आयपीएल २०२३ दरम्यान कंपनीने टाटाच्या ईलेक्ट्रीक कारसह 'इजी टू ईव्ही' मोहिमेला सुरुवात केली होती. भारतातील भावी पिढीला इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित करण्यासाठी टाटा मोटर्सने ही मोहिम हाती घेतली. या महिमेद्वारे ग्राहकांना इलेक्ट्रीक वाहनाचे महत्त्व आणि त्याचे फायदे समजावून सांगितले जात आहे. सध्या लहान व्हिडिओच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांबद्दल माहिती दिली जात आहे.

इलेक्ट्रिक वाहनांबद्दल असलेले गैरसमज

१) ईव्‍ही चार्जिंग करण्‍यासाठी खूप वेळ लागतो.

२) ईव्‍हीची बॅटरी तिच्‍या वॉरंटीपर्यंतच टिकून राहते.

३) ईव्‍ही खरेदी करण्‍यासह देखरेख ठेवण्‍यास खर्चिक आहे.

४) ईव्‍ही खरेदी करण्‍यास महाग आहेत.

५) बऱ्याच लोकांकडे ईव्‍ही नाही.

६) भारतात फारसे चार्जिंग स्‍टेशन्‍स नाहीत.

७) पावसामध्‍ये ईव्‍ही चालवणे धोकादायक आहे.

८) ईव्‍ही चार्जिंग करणे सोपे नाही.

सत्य काय?

१) फक्‍त २० मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये Tata.ev १०० किमीची रेंज देऊ शकते.

२)ईव्‍हीची बॅटरी स्‍मार्टफोन किंवा टॅब्‍लेट यांसारख्‍या इतर कोणत्‍याही ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक डिवाईसप्रमाणे तिच्‍या वॉरंटीपेक्षा अधिक काळ टिकून राहते.

३) ईव्‍हीमधील कमी पार्टसमुळे देखरेखसाठी कमी खर्च होतो.

४) ईव्‍ही पेट्रोल-संचालित वाहनांच्‍या तुलनेत ५ वर्षांमध्‍ये ४.२ लाख रूपयांहून अधिक बचत करते.

५) रस्‍त्‍यावर १.५ लाखाहून अधिक Tata.evs धावत आहेत आणि आकडेवारी वाढत आहे.

६) भारतात सध्‍या १२,००० हून अधिक सार्वजनिक चार्जिंग स्‍टेशन्‍स आहेत.

७) ईव्‍हीची मोटर व बॅटरी आयपी ६७ प्रमाणित आहे, तसेच जलरोधक व धूळरोधक आहे.

८) ईव्‍ही चार्जिंग करणे विनासायास आहे आणि घरामध्‍ये सहजपणे चार्ज करता येऊ शकते.

टाटा मोटर्सची ही मोहिम संभाव्‍य ग्राहकांमध्‍ये आत्‍मविश्‍वास निर्माण करत भारतात Tata.ev साठी विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍याला देखील चालना देत आहे. मेट्रो शहरांपासून उदयोन्‍मुख बाजारपेठांपर्यंत ईव्‍ही विभागात मोठी वाढ दिसून येत आहे, जेथे आर्थिक वर्ष २४ मध्‍ये वार्षिक ९० टक्‍के वाढ झाली आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरकर्त्यांमध्ये वाढ व्हावी, असा कंपनीचा मनसुबा आहे.

WhatsApp channel
विभाग