मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stocks to buy : आज इंट्रा डेमध्ये अदानी ट्रान्समिशन, ओएनजीसीसह हे शेअर्स आहेत चर्चेत, तज्ज्ञांचा बाय नाऊचा कौल

stocks to buy : आज इंट्रा डेमध्ये अदानी ट्रान्समिशन, ओएनजीसीसह हे शेअर्स आहेत चर्चेत, तज्ज्ञांचा बाय नाऊचा कौल

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 29, 2023 09:24 AM IST

stocks to buy : अदानी ट्रान्समिशन, आयआरसीटीसी, एनएचपीसी, टोरेंट पॉवर आणि रेल विकास निगम या कंपन्यांच्या शेअर्सवर आजचा निकाल असल्याने गुंतवणूकदारांची नजर असेल.

buy stocks HT
buy stocks HT

Stocks to buy : सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमधील स्टाॅक्सवर गुंतवणूकदारांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आज त्यांच्यात बरेच चढ-उतार पाहायला मिळत आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूकदार त्यातून नफा कमवू शकतात.

अरबिंदो फार्मा

अरबिंदो फार्मा या भारतातील अग्रगण्य औषध कंपनीने मार्च तिमाहीत ५०५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत अरबिंदो फार्माचा महसूल ६४७९ कोटी रुपये होता.

बाळकृष्ण इंडस्ट्रीज

बाळकृष्ण इंडस्ट्रीजने मार्च तिमाहीत २६० कोटींचा नफा कमावला आहे. तथापि, बाळकृष्ण इंडस्ट्रीजचा महसूल दोन टक्क्यांनी घसरून २१७९ कोटींवर आला आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी शेअर खरेदीचा कौल दिला आहे. 

अदानी ट्रान्समिशन

अदानी ट्रान्समिशन, आयआरसीटीसी, एनएचपीसी, टोरेंट पॉवर आणि रेल विकास निगम या कंपन्यांच्या शेअर्सवर आज गुंतवणूकदारांची नजर असेल. या सर्व कंपन्या आज गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत.

ओएनजीसी

तेल आणि वायू व्यवसायातील सरकारी कंपनी ओएनजीसीचा एकत्रित निव्वळ नफा मार्च तिमाहीत ५३ टक्क्यांनी घसरून ५,७०१ कोटी रुपयांवर आला आहे. मार्च तिमाहीत ओएनजीसीचा नफा १२०६१ कोटी रुपये आहे. स्टँडअलोन स्तरावर ओएनजीसीला मार्च तिमाहीत २४८ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. त्यामुळे आज ओएनजीसीच्या शेअरमध्ये घसरण दिसत आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग