Audi Q8 Etron : तिच्या नावातच आहे 'लक्झुरी', ऑडी क्यू८ ई-ट्रॉनचे बुकिंग सुरू, लवकरच लाँन्चिंग-audi q8 e tron and audi q8 sportback e tron bookings open check the details ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Audi Q8 Etron : तिच्या नावातच आहे 'लक्झुरी', ऑडी क्यू८ ई-ट्रॉनचे बुकिंग सुरू, लवकरच लाँन्चिंग

Audi Q8 Etron : तिच्या नावातच आहे 'लक्झुरी', ऑडी क्यू८ ई-ट्रॉनचे बुकिंग सुरू, लवकरच लाँन्चिंग

Aug 10, 2023 07:49 PM IST

Audi Q8 E-tron : जर्मन कार निर्माता ऑडीने आज १० ऑगस्ट २०२३ पासून भारतात नवीन ऑडी क्यू८ ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू८ स्पोर्टबॅक ई-ट्रॉनचे बुकिंग सुरू केले आहे. भारतात ही गाडी येत्या १८ आॅगस्टला दाखल होत आहे.

Audi Q8 E-tron HT
Audi Q8 E-tron HT

Audi Q8 E-tron : जर्मन कार निर्माता ऑडीने १० ऑगस्ट २०२३ पासून भारतात नवीन ऑडी क्यू८ ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू८ स्पोर्टबॅक ई-ट्रॉनचे बुकिंग सुरू केले आहे. नवीन ऑडी क्यू८ ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू८ स्पोर्टबॅक ई-ट्रॉन या इलेक्ट्रिक रेंजमधील नवीन डिझाइन केलेल्या कार आहेत. नवीन फीचर्ससोबतच त्याची बॅटरी क्षमताही खूप जास्त आहे. या दोन्ही कार अधिक रेंज आणि ड्रायव्हिंगचा आनंददायी अनुभव देतात. एकदा चार्ज केल्यानंतर ते ६०० किमीची रेंज देते.

ऑडी क्यू८ ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू८ स्पोर्टबॅक ई-ट्रॉनची बुकिंग १० ऑगस्टपासून सुरू झाली आहे. ह्या कार ग्राहक ५,००,००० रुपयांमध्ये कार बुक करू शकतात. अधिकृत वेबसाइट किंवा शोरूमद्वारे बुकिंग केले जाऊ शकते. दोन्ही मॉडेल्स भारतात १८ आॅगस्टला लाँच होत आहेत. त्यानंतरच किंमत जाहीर करण्यात येणार आहे.

बॅटरी क्षमता, बाह्यरुप

ऑडी क्यू८ ई-ट्रॉन आणि ऑडी क्यू8 स्पोर्टबॅक ई-ट्रॉन सुधारित वायुगतिकी, चांगले चार्जिंग कार्यप्रदर्शन आणि वाढीव बॅटरी क्षमतेसह येतात. त्याची रेंज एसयूव्हीमध्ये ५८२ किमी आणि स्पोर्टबॅकमध्ये ६०० किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे. कारच्या पुढील भागामध्ये बदल करण्यात आले आहेत. क्यू८ मॉडेलचे नाव ऑडीच्या इलेक्ट्रिक कार मॉडेलच्या सगळ्यात वरती आहे.

नऊ रंगात उपलब्ध

नवीन ऑडी क्यू८ ई-ट्रॉन नऊ एक्‍सटीरियर कलर ऑप्शनमध्ये पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये मडेरा ब्राउन, क्रोनोस ग्रे, ग्लेशियर व्हाइट, मायथोस ब्लॅक, प्लाझ्मा ब्लू, सोनेरा रेड, मॅग्नेट ग्रे, सियाम बेज आणि मॅनहॅटन ग्रे यांचा समावेश आहे. कारच्या इंटिरिअर भागात, नवीन क्यू८ ई-ट्रॉन ओकापी ब्राउन, पर्ल बेज आणि ब्लॅक या तीन रंगांमध्ये लाँच केले जाईल.

ग्राहकांना नेहमी लक्षात ठेवण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून, ऑडी इंडियाने अलीकडेच इलेक्ट्रिक वाहन मालकांसाठी मायऑडीकनेक्ट अ‍ॅपवर चार्ज माय ऑडी पर्यायाच्या रूपात उद्योगातील पहिला उपक्रम लाँच केला आहे. हे वन स्टॉप सोल्यूशन आहे जेथे ऑडी ई-ट्रॉनच्या ग्राहकांना एकाच अ‍ॅपवर एकाधिक वाहन चार्जिंग भागीदारांना प्रवेश मिळेल.

विभाग