Audi A4 Signature Edition लाँन्च, काय आहे फिचर्स आणि किंमत
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Audi A4 Signature Edition लाँन्च, काय आहे फिचर्स आणि किंमत

Audi A4 Signature Edition लाँन्च, काय आहे फिचर्स आणि किंमत

HT Marathi Desk HT Marathi
Published Jun 16, 2025 12:58 PM IST

Audi A4 Signature Edition launch : ऑडी या जर्मन लक्‍झरी कार उत्‍पादक कंपनीने ऑडी ए४ सिग्‍नेचर एडिशन लाँन्च केली आहे.

Audi A4 Signature Edition
Audi A4 Signature Edition

Audi A4 Signature Edition launch : ऑडी इंडिया कंपनीने आपल्या लोकप्रिय सेडान Audi A4 च्या सिग्नेचर एडिशनच्या लाँचची घोषणा केली आहे. या खास एडिशनमध्ये प्रीमियम डिझाइनचा समावेश असून कारच्या लुकमध्ये आणि आकर्षकतेत मोठी भर घालणारी वैशिष्ट्ये आहेत. सिग्नेचर एडिशनमध्ये विशेष स्टायलिंग अपडेट्ससह, Audi Rings LED वेलकम लॅम्प्स, विशेष डेकल्स, आणि डायनॅमिक व्हील हब कॅप्स यांसारखी अनेक नवीन आकर्षक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. लक्झरी कारच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी ही कार एक चांगला पर्याय ठरू शकते.

किंमत

आँडी ए ४ सिग्नेचरची सुरूवातीची किंमत ५७,११,००० (एक्स-शोरूम) असून, ही कार मर्यादित युनिट्समध्ये उपलब्ध आहे. ही एडिशन फक्त टेक्नॉलॉजी व्हेरिएंटमध्ये येते आणि यामधील सिग्नेचर वैशिष्ट्ये Audi Genuine Accessories चा भाग आहेत.

रंगसंगती

ही कार पाच रंगांमध्ये उपलब्ध असून ग्लेशियर व्हाईट मेटॅलिक, मिथोस ब्लॅक मेटॅलिक, नवारा ब्ल्यू मेटॅलिक, प्रोग्रेसिव्ह रेड मेटॅलिक आणि मॅनहॅटन ग्रे मेटॅलिकमध्ये उपलब्ध आहे.

आरामदायक अनुभव देण्याचा प्रयत्न

या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्‍लों म्‍हणाले, ऑडी ए४ आमच्‍या लाइन-अपमधील सर्वाधिक विक्री होणारी सेदान आहे. या कारमध्‍ये गतीशीलता, कार्यक्षमता आणि अत्‍याधुनिक आकर्षकतेचे संयोजन आहे. सिग्‍नेचर एडिशनच्‍या लाँचसह आम्‍ही ग्राहकांना अधिक विशेष व्‍हेरिएण्‍टचे मालक बनण्‍याची संधी देत आहोत.

या खास वैशिष्ट्यांचा समावेश

नव्याने दाखल झालेल्या गाडीत पार्क असिस्ट आणि ३६०-डिग्री कॅमेऱ्यासह अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर ड्रायव्हिंगचा अनुभव ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय वूड ओक आणि नॅचरल ग्रे या आकर्षक शेड्समध्ये नवीन डेकोरेटिव्ह इनलेज , आकर्षक वेलकम प्रोजेक्शन तयार करणारे नवीन ऑडी रिंग्स एंट्री एलईडी लॅम्प्स ,अधिक प्रभावी ब्रँड उपस्थितीसाठी खास ऑडी रिंग्स डेकल्स, चाक फिरत असतानाही ऑडी लोगो अचूक स्थितीत ठेवणारे डायनॅमिक व्हील हब कॅप्स, केबिनमध्ये आल्हाददायक वातावरण निर्माण करणारा प्रीमियम फ्रॅग्रन्स डिस्पेन्सर, वाहनाला अधिक गतीशील रूप देणारा अ‍ॅरोडायनॅमिक स्पॉयलर लिप, अधिक आकर्षक शैलीसाठी खास डिझाइन असलेले अलॉय व्हील पेंटचा समावेश आहे.

इंजिन क्षमता

• 2.0 लिटर TFSI इंजिन, 204 HP शक्तीसह आणि 320 Nm टॉर्क

• 0 ते 100 किमी/तास फक्त 7.1 सेकंदांत

• 241 किमी/तासची कमाल गती

• 12-वोल्ट माइल्ड हायब्रिड सिस्टम – इंधन कार्यक्षमतेत वाढ

• ब्रेक रिकुपरेशन तंत्रज्ञान – इंधन बचतीसाठी

अत्याधुनिक सोई

• 25.65 सेमीचा MMI टच डिस्प्ले – अ‍ॅकॉस्टिक फीडबॅकसह

• ऑडी स्मार्टफोन इंटरफेस

• नैसर्गिक भाषा ओळखणारे व्हॉईस कंट्रोल

• ऑल-डिजिटल व्हर्च्युअल कॉकपिट प्लस

• अ‍ॅम्बियंट लाइटिंग – 30 रंगांचे पर्याय

• कम्फर्ट की – कीलेस एन्ट्री आणि बूट लिडसाठी जेश्चर-आधारित ओपनिंग

• वायरलेस चार्जिंगसह Audi Phone Box

Whats_app_banner