Asus Upcoming Smartphones: गेमिंग स्मार्टफोन आवडणाऱ्या युजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. एससने मंगळवारी रोग फोन ८ मालिकेतील स्मार्टफोन सादर केले. या मालिकेत फोन ८ आणि रोग फोन ८ प्रो यांचा समावेश आहे. भारतीय ग्राहक या फोन्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. फोनच्या लॉन्चिंगबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, कंपनीने रोग फोन ८ प्रोची किंमत उघड करून वापरकर्त्यांची उत्सुकता आणखी वाढवली. एसस फोन ८ प्रोच्या १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९४ हजार ९९९ रुपये आहे. तर, २४ जीबी रॅम आणि एक टीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंटसाठी ग्राहकांना १ लाख १९ हजार ९९९ रुपये खर्च करावे लागतील.
एसस फोन ८ प्रो फक्त फँटम ब्लॅक कलर पर्यायात खरेदी करता येणार आहे. हा फोन कोणत्या दिवशी बाजारात येईल, याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. हा फोन एसस एक्स्लुझिव्ह स्टोर आणि आणि एसस रोग स्टोर व्यतिरिक्त कंपनीच्या ई-शॉपवर उपलब्ध असेल. हा फोन सॅमसंग, ऍपल आणि वनप्लसच्या प्रीमियम स्मार्टफोनला टक्कर देईल, असा कंपनीचा दावा आहे.
या फोनमध्ये ग्राहकांना ६.७८ इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED LTPO डिस्प्ले मिळत आहे, जो 165Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये तुम्हाला 2500 nits चा पीक ब्राइटनेस लेव्हल मिळेल. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये Gorilla Glass Victus 2 देण्यात आला आहे. फोनमध्ये LPDDR5X RAM आणि UFS 4.0 स्टोरेज आहे. तसेच Snapdragon 8 Gen 3 चिपसेट पाहायला मिळेल.
फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि ३२ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये तुम्हाला ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. फोनच्या मुख्य कॅमेऱ्याची खासियत म्हणजे तो ओआयएस म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह येतो. फोनमध्ये ५ हजार ५०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे, जी ६५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 14 वर आधारित ROG UI वर काम करतो.