झटका! AI च्या माध्यमातून होऊ लागले काम, आता २ लाख नोकऱ्यांवर ‘संक्रांत’, नव्या अहवालानं टेन्शन वाढवलं
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  झटका! AI च्या माध्यमातून होऊ लागले काम, आता २ लाख नोकऱ्यांवर ‘संक्रांत’, नव्या अहवालानं टेन्शन वाढवलं

झटका! AI च्या माध्यमातून होऊ लागले काम, आता २ लाख नोकऱ्यांवर ‘संक्रांत’, नव्या अहवालानं टेन्शन वाढवलं

Jan 10, 2025 03:56 PM IST

Artificial intelligence impact impact : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आधारित टूलमध्ये येत्या तीन ते पाच वर्षांत वॉल स्ट्रीटमधील दोन लाखांहून अधिक नोकऱ्या जातील, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अनेक कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धतही बदलणार असल्याचे म्हटले आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नोकऱ्यांवर परिणाम
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा नोकऱ्यांवर परिणाम

Artificial intelligence impact : आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) परिणाम जीवनाच्या विविध क्षेत्रात दिसून येत असून त्यामुळे आता बरीच कामे सोपी झाली आहेत. सर्वजण आर्टफिशियल इंटेलिजेंसचा वापर करताना दिसून येत आहेत. मात्र हे वेगाने पसरणारं तंत्रज्ञान लोकांच्या नोकऱ्यांवर उठलं आहे. एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येईल, अशी चिंता तज्ज्ञांनी आधीच व्यक्त केली होती आणि आता तेच दिसून येत आहे. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सच्या एका नव्या अहवालानुसार येत्या तीन ते पाच वर्षांत जागतिक बँकांच्या दोन लाखांहून अधिक नोकऱ्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. 

बीआयच्या मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणानुसार एकूण नोकऱ्यांपैकी ३ टक्के नोकऱ्या कमी होतील आणि लाखो जणांच्या नोकऱ्या जातील. बीआयचे वरिष्ठ विश्लेषक टोमाझ नोएत्झेल यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे की, अशा सर्व नोकऱ्या, ज्यांना वारंवार एकच काम करावे लागते, ते जाण्याचा धोका आहे. मात्र, अनेक नोकऱ्या पूर्णपणे संपुष्टात येणार नाहीत आणि त्यांची काम करण्याची पद्धत बदलेल. यामुळे जे कर्मचारी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कालानुरुप जुळवून घेतील त्यांच्या नोकऱ्या वाचतील मात्र काम करण्याची पद्धत आमूलाग्र बदलणार आहे.

या कारणांमुळे जातील नोकऱ्या -

ब्लूमबर्ग इंटेलिजन्सने समाविष्ट केलेल्या पीअर ग्रुपमध्ये Citigroup Inc., JPMorgan Chase & Co. आणि Goldman Sachs Group Inc. यांचा समावेश आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ९३ जणांपैकी सुमारे एक चतुर्थांश लोकांनी सांगितले की, एआयच्या वापरानंतर एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५ ते १० टक्के कर्मचारी प्रभावित होतील. खरे तर एआय टूल्समुळे कंपन्यांची उत्पादकता तर वाढेलच, शिवाय त्यांचा खर्चही कमी होऊ शकेल. एआय टूल्समुळे सध्याच्या कामाचा वेगही वाढणार आहे.

सर्वाधिक फटका बँकिंग क्षेत्राला -

बँकिंग क्षेत्रातून सर्वाधिक नोकऱ्या जाणार असून इतर कोणत्याही क्षेत्राच्या तुलनेत बँकिंग क्षेत्रातील ५४ टक्के नोकऱ्या ऑटोमेशन केल्या जाऊ शकतात, असे समोर आले आहे. नोकऱ्या पूर्णपणे नष्ट होण्याऐवजी नव्या संधी निर्माण होतील आणि एआयच्या आगमनानंतर सध्याची काम करण्याची पद्धत बदलेल, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.

Whats_app_banner