मराठी बातम्या  /  business  /  Archen Chemical IPO : आर्चियन केमिकल इंडस्ट्रीचा आयपीओ हीट, १४ टक्के उसळी
IPO HT
IPO HT

Archen Chemical IPO : आर्चियन केमिकल इंडस्ट्रीचा आयपीओ हीट, १४ टक्के उसळी

21 November 2022, 16:33 ISTKulkarni Rutuja Sudeep

आर्चियन केमिकल इंडस्ट्रीने स्टाॅक मार्केटमध्ये पहिल्याच दिवशी चांगलीच कामगिरी केली आहे. सोमवारी सकाळी या आयपीओची लिस्टिंग १०.३२ टक्के वाढीसह ४४९ रुपयांवर झाली.

Archen Chemical IPO : आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजच्या आयपीओवर सट्टा लावणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी. कंपनीच्या आयपीओने पहिल्याच दिवशी चांगली वाढ नोंदवली सोमवारी सकाळी या आयपीओची लिस्टिंग १०.३२ टक्के वाढीसह ४४९ रुपयांवर झाली. याचा अर्थ ज्या गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स अलाॅट्स झाले असतील, त्यांना लिस्टिंगच्या वेळी ४२ रुपये प्रति शेअर्स फायदा झाला. सकाळी १०.१४ मिनिटांवर आर्चिअन केमिकल्सच्या शेअर्समध्ये १३.८० टक्के वाढीसह ४६३.१५ रुपयांवर ट्रेड करत होते.

ट्रेंडिंग न्यूज

प्री ओपनिंग मार्केट

प्री ओपनिंग मार्केटमध्ये कंपनीची सुरुवात खराब झाली होती. मात्र कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. लिस्टिंगच्या आधी प्री ओपनिंग सेशनमध्ये कंपनीच्या शेअर्सवर ट्रेड करत होती.

आर्चियन केमिकल्स इंडस्ट्रीच्या आयपीओचा प्राईज बॅड ३८६ रुपये ते ४०७ रुपये होता. हा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी ९ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर दरम्यान खुला होता. या पब्लिक इश्यूला ३२.२३ पट सबस्क्राईब केला होता. रिटेलमध्ये ९.९६ पट सबस्क्राईबर्स मिळाले होते.

(डिस्‍क्‍लेमर: ही माहिती केवळ कंपन्यांच्या शेअर मार्केटमधील कामगिरीवर आधारीत आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं वाचकांनी आपल्या वित्तीय सल्लागाराच्या सुचनेनुसारच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.)

विभाग