प्रतीक्षा संपली! दमदार फीचरसह iPhone 16 भारतात झाला लॉन्च; प्रो, मॅक्स मॉडेल्स किती रुपयांना मिळणार ? वाचा-apple launches new iphone 16 series with apple intelligence check features and pricing ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  प्रतीक्षा संपली! दमदार फीचरसह iPhone 16 भारतात झाला लॉन्च; प्रो, मॅक्स मॉडेल्स किती रुपयांना मिळणार ? वाचा

प्रतीक्षा संपली! दमदार फीचरसह iPhone 16 भारतात झाला लॉन्च; प्रो, मॅक्स मॉडेल्स किती रुपयांना मिळणार ? वाचा

Sep 10, 2024 07:57 AM IST

iphone 16 series : मोबाइल फोन कंपनीतील आघाडीची असलेल्या अॅपलने भारतीय बाजारात आयफोन १६ लॉन्च केला आहे. आयफोन १६ मध्ये विविध अपडेट देण्यात आले आहेत. या सोबतच कॅमेरा डिझाईनमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे.

प्रतीक्षा संपली! दमदार फीचरसह iPhone 16 भारतात झाला लॉन्च; प्रो, मॅक्स मॉडेल्स किती रुपयांना मिळणार ? वाचा
प्रतीक्षा संपली! दमदार फीचरसह iPhone 16 भारतात झाला लॉन्च; प्रो, मॅक्स मॉडेल्स किती रुपयांना मिळणार ? वाचा (AFP)

iphone 16 series : आयफोनचया नव्या सिरिजच्या प्रतीक्षेत अनेक नागरिक होते. त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. आयफोनने १६ सिरिज भारतात लॉन्च केली आहे. या नव्या सिरिजमध्ये आतापर्यंतचे सर्वांत दमदार फिचर्स देण्यात आले आहे. हा फोन कसा असणार? त्याची किंमत काय असेल? असे अशा अनेक प्रश्नांबाबत लोकांना उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली आहे. भारतात हा फोन कितीला मिळेल? फोनमध्ये फीचर काय आहेत ? जाणून घेऊयात.

कॅलिफोर्निया टेक कंपनी ऍपलने आपल्या वर्षातील सर्वात मोठ्या लॉन्च इव्हेंटमध्ये बहुप्रतिक्षेत असलेल्या आयफोन १६ मालिकेतील फोनचया नव्या मॉडेल्सचे अनावरण केले आहे. या सिरिजमध्ये आयफोन १६, आय फोन १६ प्लस, आयफोन प्रो, आणि आयफोन १६ प्रो मॅक्स या मॉडेलचा समावेश आहे. या फोनमध्ये अत्याधुनिक उपकरणे, हार्डवेअर आधारित कॅमेरा कंट्रोल बटण देण्यात आले असून यामुळे वापरकरणाऱ्यांच्या फोटोग्राफीचा अनुभव भन्नाट होणार आहे. याशिवाय, ए १८ आणि आणि ए १८ प्रोसह जबरदस्त परफॉर्मन्स अपग्रेड्स देखील देण्यात आले आहेत. अॅपल इंटेलिजेंस आधारित फीचर्समुळे आयफोन वापरण्याचा अनुभव पूर्ण बदलणार आहे.

आयफोन १६ आणि १६ प्लसची वैशिष्ट्ये

अॅपलचा आयफोन १६ हा एरोस्पेस ग्रेड ॲल्युमिनियम डिझाइनसह बाजारात आणण्यात आला आहे. हा फोन ५ नव्या रंगात उपलब्ध होणार आहे. या फोनला काचेच्या सिरेमिक शील्डसह मजबूत संरक्षण देण्यात आले आहे. आय फोन १६ मध्ये ६.१ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर आयफोन १६ प्लसमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. याशिवाय नवीन डिव्हाईसमध्ये ॲक्शन बटण आणि हार्डवेअर आधारित कॅमेरा कंट्रोल्स देखील देण्यात आले आहेत. ॲपलच्या इन-हाउस ६ कोर सीपीयू आणि ५ कोर जीपीयूसह ३ एनएम ए १८ चिप्ससह, त्यांना विशेष ऍपल इंटेलिजेंस फीचर देखील देण्यात आले आहेत. यामुळे गेमिंगसाठीव चांगल्या प्रकारच्या फोटो व्हिडिओसाठी याचा फायदा होणार आहे.

नवीन कॅमेरा कंट्रोल बटणामुळे वापरकर्त्यांना फोटो क्लिक करणे सोपे झाले आहे. हे बटन दाबल्यास कॅमेरा उघडतो. तसेच दीर्घ टॅपिंग केल्यावर थेट व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला जाऊ शकतो. या फीचरमध्ये झूम सारखे पर्याय देखील देण्यात आले आहे. व कॅमेरा नियंत्रणे देखील यात केले जाऊ शकते. वापरकर्त्यांना या बटणासह लाईट प्रेस आणि क्लिक दोन्ही पर्याय मिळणार आहे. या फोनमध्ये ४८ मेगा पीक्सलसह मुख्य कॅमेरा आणि १२ मेगा पीस्कलसह अल्ट्रा-वाइड लेन्ससह ड्युअल ४८ मेगा पीस्कल फ्यूजन कॅमेरा सेटअप या उपकरणांचा समावेश आहे. मुख्य लेन्सचा वापर २x टेलीफोटो कॅमेरा आणि मॅक्रो लेन्स म्हणून देखील केला जाऊ शकतो. यात १२ मेगा पीक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

कंपनीचा दावा आहे की iOS १८ सह, नवीन कस्टमायझेशन आणि उत्पादकता वैशिष्ट्ये नवीन उपकरणांचा एक भाग बनली आहेत. तसेच या फोनमध्ये दमदार बॅटरी देखील देण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत सॅटेलाइटच्या मदतीने मेजेस पाठवण्याचा पर्यायही या फोनमध्ये देण्यात आला आहे.

आयफोन १६ प्रो आणि १६ प्रो मॅक्सची वैशिष्ट्ये

नवीन आयफोन १६ प्रो मध्ये मोठा ६.३ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये मोठा ६.९ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यात ग्रेड ५ टायटॅनियम बिल्ड मध्ये देण्यात आला आहे. पूर्वीपेक्षा मोठ्या डिस्प्लेमध्ये सिरॅमिक शील्ड संरक्षण आहे आणि नेहमी ऑन डिस्प्लेसह १२० Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. उत्तम बॅटरी ऑप्टिमायझेशन आणि कूलिंग सिस्टमचा फायदाही देण्यात आला आहे. आयफोन १६ प्रो मॅक्समध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी आयफोन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी दीर्घ काल टिकू शकेल.

प्रो मॉडेल्समध्ये, अॅपलने ३ एनएम प्रक्रियेवर आधारित १६ कोर न्यूरल इंजिन, ६ कोर सीपीयू आणि ६ कोर जीपीयूसह ए १८ प्रो चिप देण्यात आली आहे. यात ४८ एमपी फ्यूजन कॅमेरा, ४८ एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि १२ एमपी ५ x टेलीफोटो कॅमेरा सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. डीएसएलआर कॅमेऱ्यांप्रमाणे, वापरकर्त्यांना फोकस लॉक करण्याचा आणि कॅमेरा कंट्रोल बटणासह शूट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याशिवाय फोटोग्राफीच्या अनेक फीचरचा देखील या फोनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

कंपनीने प्रथमच कॅमेरामध्ये 4Kस्लो मोशन फीचर आणले आहे. यामध्ये चार स्टुडिओ-गुणवत्तेचे मायक्रोफोन दिले गेले आहेत आणि विशेष ऑडिओ कॅप्चर आणि ऑडिओ मिक्स वैशिष्ट्ये देखील नवीन आयफोन मॉडेल्सचा एक महत्वाचे फीचर आहे. मॅगसेफ चार्जिंगला आयफोन १६ प्रो मॉडेल्ससह अपग्रेड देखील देण्यात आले आहे.

भारतीय बाजारात काय असेल किंमत ?

भारतीय बाजारपेठेत, आयफोन १६ ची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरू होते आणि आय फोन १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपयांपासून सुरू होते. या दोन्हींच्या बेस मॉडेलमध्ये १२८ जीबी स्टोरेज आहे. हा फोन ५ रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. यात अल्ट्रामॅरिन, टील, गुलाबी, पांढरा आणि काळा. तर, आयफोन १६ प्रो (१२८ जीबी) ची किंमत ११९९०० रुपयांपासून सुरू होते आणि आयफोन १६ प्रो मॅक्स (२५६ जीबी) ची किंमत १४४९०० रुपयांपासून सुरू होते. प्रो मॉडेल ब्लॅक टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम आणि डेझर्ट टायटॅनियम या ४ रंगामध्ये हा फोन येतो.

भारतीय बाजरात १३ सप्टेंबरपासून या फोनची प्री बूकिंग करता येणार असून त्याची विक्री ही २० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

Whats_app_banner
विभाग