iPhone: 'ही' ट्रिक वापरून ९० हजारांचा आयफोन १६ खरेदी केला अवघ्या २७ हजारांत!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  iPhone: 'ही' ट्रिक वापरून ९० हजारांचा आयफोन १६ खरेदी केला अवघ्या २७ हजारांत!

iPhone: 'ही' ट्रिक वापरून ९० हजारांचा आयफोन १६ खरेदी केला अवघ्या २७ हजारांत!

Updated Oct 08, 2024 12:19 PM IST

Apple iPhone 16 for ₹27000: नुकताच लॉन्च झालेल्या ९० हजारांचा आयफोन १६ १६ एका व्यक्तीने अवघ्या २७ हजारात कसा मिळवला? जाणून घ्या.

अवघ्या २७ हजारांत खरेदी केला आयफोन १६!
अवघ्या २७ हजारांत खरेदी केला आयफोन १६!

iPhone Offers: अ‍ॅपल कंपनीने नुकतीच आयफोन १६ सीरीज लॉन्च केली. आयफोन १६ ची सुरुवाती किंमत ७९ हजार ९०० रुपये आहे. तर, आयफोन १६ च्या २५६ जीबी व्हेरिएंट ८९ हजार ९०० रुपये आहे. परंतु, एका व्यक्तीने अवघ्या २७ हजारांत हा फोन खरेदी केला. याबाबत संबंधित व्यक्तीने सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकीत झाले. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर लोकही जोरदार कमेंट करत आहेत. मात्र, या व्यक्तीने नुकताच लॉन्च झालेला आयफोन १६ इतक्या स्वस्तात कसा मिळवला? याबाबत जाणून घेऊयात.

एका व्यक्तीने रेडीटवर पोस्ट केले की, त्याने क्रेडिट कार्डद्वारे ८९ हजार रुपये किमतीचा आयफोन १६ खरेदी केला आहे. वास्तविक या व्यक्तीने रिवॉर्ड पॉइंट्स वापरून हा फोन खरेदी केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनेक बँका प्रत्येक खरेदीवर काही रिवॉर्ड पॉइंट देतात, ज्याचा वापर करून तुम्ही ते डिस्काउंट कूपनमध्ये किंवा रोख स्वरूपातही रिडीम करू शकता. आयफोन १६ खरेदी करताना त्या व्यक्तीने ६२ हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रिवॉर्ड पॉइंट वापरले. यामुळे फोनच्या किंमतीत लक्षणीय घट झाली. त्या व्यक्तीने २७ हजार रुपये रोख दिले आणि उर्वरित रक्कम रिवॉर्ड पॉइंटद्वारे दिली.

संबंधित व्यक्तीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर लोकांना प्रश्न पडला की, त्यांच्याकडे इतके रिवॉर्ड पॉइंट्स कुठून आले. यानंतर त्या व्यक्तीने याचा खुलासाही केला आणि सांगितले की त्याने क्रेडिट कार्डद्वारे सुमारे १५ लाख रुपये खर्च केले, ज्याच्या बदल्यात त्याला ६२ हजार ९३० रुपयांचे रिवॉर्ड पॉइंट मिळाले. आता याचा वापर करून त्या व्यक्तीने ९० हजार रुपये किंमतीचा आयफोन १६ अवघ्या २७ हजरांत विकत घेतला.

जुन्या आयफोनच्या खरेदीवर ऑफर्स

अ‍ॅपलने आपल्या आयफोन १५ आणि आयफोन १४ मॉडेलच्या किंमतीत १० हजार रुपयांची कपात केली आहे. मात्र, कंपनीने आयफोन १५ प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त, आयफोन १५, आयफोन १५ प्लस खरेदीवर त्वरीत ४००० रुपयांचे कॅशबॅक मिळत आहे. तर, आयफोन १४, आयफोन १४ प्लसवर ३००० हजारांची सूट मिळत आहे. अमेरिकन एक्सप्रेस, अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डसह जुन्या मॉडेल्सवर सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय प्लॅनसह ही ऑफर उपलब्ध आहे.

आयफोन १६ कुठून खरेदी करायचा?

आयफोन १६ सीरिजमधील फोन ऑर्डर करण्यासाठी ग्राहक अ‍ॅपल स्टोअर ऑनलाइन, अ‍ॅपल स्टोर साकेत (दिल्ली), अ‍ॅपल स्टोअर बीकेसी (मुंबई), फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स, युनिकॉर्न स्टोअर्स, इमॅजिन स्टोअर्स, एमअ‍ॅपल स्टोअर्स, आयकॉन्सेप्ट स्टोअर, आयप्लॅनेट स्टोअर्स आणि एट्रोनिक्स स्टोअर्स येथे भेट देऊ शकतात.

Whats_app_banner