iPhone 15 Price Drop: आयफोन चाहत्यांच्या आनंदात भर टाकणारी माहिती समोर आली. अॅमेझॉनवर आयफोन १५ च्या खरेदीवर भरघोस डिस्काऊंट दिले जात आहे. अॅमेझॉनवर आयफोन १५ च्या किंमतीत १० टक्के कपात करण्यात आली आहे. याशिवाय, अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. यामुळे आयफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी एक उत्तम संधी आहे.
अॅमेझॉनवर आयफोन १५ हा ७९ हजार ९०० रुपयांना लिस्ट करण्यात आला होता. मात्र, आता आयफोन १५ हा १० टक्के डिस्काऊंटसह ७२ हजार २०० रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. दरम्यान, १० टक्के डिस्काऊंटसह ग्राहक विविध ऑफर आणि सवलतींचा लाभ घेऊ शकतात. निवडक क्रेडिट कार्ड आणि एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डवर ४,००० रुपयांपर्यंत च्या सवलतीसह अॅमेझॉन आकर्षक बँक ऑफर देत आहे.
याशिवाय ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआय पर्यायाचा लाभ घेता येणार असून, ईएमआय ३,५०० रुपयांपासून सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त, ७००० रुपयांची सूट मिळविण्यासाठी एअरटेल पोस्टपेडवर स्विच करणे यासारख्या भागीदार ऑफर देखील उपलब्ध आहेत. या ऑफर्समुळे ग्राहकांना आयफोन १५ च्या खरेदीवर मोठी बचत करता येणार आहे.
आयफोन १५ मध्ये ग्राहकांना ६.१ इचंचा डिस्प्ले मिळत आहे. फोनमध्ये तुम्हाला A16 Bionic चिपसेटचा सपोर्ट मिळतो जो कंपनीने गेल्या वर्षी आयफोन १४ प्रो मॉडेल्समध्ये दिला होता. आयफोन १५ मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळत आहे. मुख्य कॅमेरा ४८ मेगापिक्सलसह १२ मेगापिक्सलचा पोट्रेट कॅमेरा मिळत आहे.सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
अॅपल आयफोन १५ च्या किंमतीत कपात आणि अॅमेझॉनवर उपलब्ध ऑफर्स आणि सवलतींमुळे अधिक किफायतशीर किंमतीत प्रीमियम स्मार्टफोनचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक आकर्षक निवड बनली आहे.
संबंधित बातम्या